शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

शहादा वार्तापत्र-कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:14 IST

शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, २७५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आजपर्यंत तालुक्यातून तीन हजार ...

शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, २७५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आजपर्यंत तालुक्यातून तीन हजार २७६ रुग्णांपैकी दोन हजार ९३५ जण बरे झाले आहेत. जिल्ह्यात शहादा तालुका हॉटस्पॉट ठरू पाहत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांचे विलगीकरण करण्यात येत असले, तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासन निर्देशाचे पालन करून वाढत्या संसर्गावर निकडीच्या उपाय म्हणून लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम यासह विविध समारंभ आटोपशीर घेणे महत्त्वाचे आहे.शहादा तालुक्यात सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून आली होती. जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू तालुक्यातच झाला होता. दरम्यानच्या काळात प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने, तसेच उपाययोजनांची त्यात भर पडल्याने गेले तीन महिने रुग्णसंख्या नगण्य झाली होती, परंतु गेल्या महिन्याभरापासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत असून, ती चिंतेची बाब ठरत आहे. तालुक्यातील कलमाडी, तऱ्हाडी, जावदा आदी गावांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणा गावात पथकामार्फत सर्वे करून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, तसेच हायरिस्क कॉन्टॅक्ट तपासणीवर भर असला, तरी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे.

ईश्वर पाटील

लाेकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यात अचानक एवढी रुग्ण संख्या वाढीचे नेमके कारण काय? कोरोनाचा नवीन ट्रेंड तर नाही ना? याचा शोध आरोग्य यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे तालुक्यात परदेशवारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, तसेच नाशिक, मुंबई, पुणे या मोठ्या शहरांशी नियमित संपर्क, तसेच ये-जा सुरू असते, याचाही शोध आरोग्य यंत्रणेने घ्यावा. बाहेरून आलेल्यांची तपासणी करून आवश्यक वाटल्यास विलगीकरणाच्या सूचना देणे गरजेचे आहे. रविवारी सकाळी बिलाडी त.सा. व बामखेडा या ठिकाणी चार ते पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरसे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी या अधिकाऱ्यांनी दोन्ही गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. सोमवारी या दोन्ही गावांत आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करून तत्काळ उपाययोजना करण्याचे प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी सांगितले.शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गजन्य रुग्णांची वाढती संख्या बघता, नागरिकांनी शासकीय नियमावलीनुसार सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत. आरोग्याची काळजी घेत, मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम करताना, शासनाच्या नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे.