शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.प., पं.स., जि.प.सदस्यांनी लसीकरणासाठी जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

शहादा तालुक्यात १३ शासकीय आणि तीन खासगी अशी एकूण १६ लसीकरण केंद्र आहेत. पैकी शहरात फक्त एकच शासकीय केंद्र ...

शहादा तालुक्यात १३ शासकीय आणि तीन खासगी अशी एकूण १६ लसीकरण केंद्र आहेत. पैकी शहरात फक्त एकच शासकीय केंद्र आहे. या सर्व केंद्रावर अजूनही पाहिजे, तेवढे लसीकरण झालेले नाही. कोविड १९चा प्रादुर्भाव बघता, लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. शहरात आठ प्रभागांत आठ लसीकरण केंद्र उभारून प्रभागातच लसीकरणाची सोय झाल्यास लसीकरणाचा वेग वाढू शकतो. प्रत्येक प्रभागात ३/४ नगरसेवक आहेत. प्रभागात १०० टक्के लसीकरण करण्याची जबाबदारी या नगरसेवकांवर टाकली पाहिजे. आपल्या प्रभागातील मतदारांचे आरोग्य सुरक्षित राखणे ही या नगरसेवकांचीही जबाबदारी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर टाकली पाहिजे, तरच लसीकरणाचा वेग वाढू शकेल. ग्रामीण भागातही ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांवर त्या-त्या गावातील ग्रामस्थांच्या लसीकरणाची जबाबदारी सोपवली पाहिजे. लसीकरण झाल्याने सुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने तालुक्यातील भीतीचे वातावरण कमी होऊन काही प्रमाणात का होईना, तालुक्यात कोविड १९ला आळा बसू शकेल.

--------------------------------------------------------------

नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक, नगराध्यक्ष यांचा तर ग्रामीण क्षेत्रात ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांचा प्रभाव असतो. कोविड १९ लसीकरण संदर्भात अजूनही काही गैरसमज असल्याने लोक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. अशा वेळी लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागातील, वार्डातील मतदारांचे प्रबोधन करून त्यांचे लसीकरण करून घेऊ शकतात. लोकप्रतिनिधींनीही आपली जबाबदारी समजून आपल्या प्रभागात १०० टक्के लसीकरण करून प्रशासनास मदत केली पाहिजे, असेही बोलले जात आहे.