शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दुर्गम भागात राज्यपाल भेट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत़ याअंतर्गत २० व २१ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत़ याअंतर्गत २० व २१ फेब्रुवारी रोजी ते जिल्ह्यात येत आहेत़राज्यपाल कोश्यारी हे २० रोजी सकाळी मोलगी येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत़ येथून १० वाजेच्या सुमारास मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन माहिती घेणार आहेत़ या भेटीनंतर ते भगर प्रोसेसिंग युनिटची पाहणी करुन आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन करणार आहेत़ या भेटीदरम्यान आकांक्षित जिल्ह्यासंबधी बैठक घेऊन स्थानिक आदिवासी बांधवांसोबत संवाद साधणार आहेत़ याउपक्रमानंतर भगदरी ता़अक्कलकुवा येथील माती नाला बांधची पाहणी करुन याच परिसरातील अंगणवाडी व पोषण परसबागेची पाहणी करणार आहेत़राज्यपाल कोश्यारी हे सायंकाळपर्यंत भगदरी येथील पशुसंवर्धन कार्यक्रमांतर्गत उपक्रम, पोल्ट्री युनिट, सिमेंट नाला बांध यांची पाहणी करुन उपस्थितांसोबत संवाद साधणार आहेत़ दौऱ्यादरम्यान मनरेगाच्या वैयक्तिक लाभार्थींची भेट घेऊन पेरु बागेला भेट देतील़ राज्यपालांच्या हस्ते भगदरी पशुसंवर्धन केंद्र, शासकीय आश्रमशाळा येथे विविध उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे़मोलगी येथे मुक्काम करुन २१ रोजी सकाळी मोलगी येथून रवाना होणार आहेत़ सकाळी नंदुरबार येथील विधी महाविद्यालयात कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे़विधी महाविद्यालयातील कार्यक्रमात हजेरी दिल्यानंतर जळखे येथील डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या अनुदानित आश्रमशाळेत भेट देत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत़ दुपारी नावली, ता़नवापूर येथील शेतकऱ्यांसोबत संवाद कार्यक्रम आटोपल्यानंतर ते खांडबारा येथून मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे़ राज्यपालांच्या दौºयामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे़