शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ येथे पर्यटन व्यवसायाला पुन्हा ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

तोरणमाळ हे थंड हवेचे निसर्ग सौंदर्यस्थळ असून, येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत होती. यामुळे अशा अतिदुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग ...

तोरणमाळ हे थंड हवेचे निसर्ग सौंदर्यस्थळ असून, येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत होती. यामुळे अशा अतिदुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तोरणमाळ ग्रामपंचायत तसेच म्हसावद पोलीस ठाणेअंतर्गत संयुक्त बैठक बोलावून शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन तसेच आठवडे बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांना तोरणमाळ पर्यटन स्थळावर येण्यास बंदी होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. घरात बसून राहिलेल्या पर्यटकांना थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ पर्यटनस्थळ अनलॉक झाल्याने पर्यटक हजेरी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वातावरण आल्हाददायक

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. परंतु १५ दिवसांच्या कालावधीत काही प्रमाणातच पावसाने हजेरी लावली. यामुळे तोरणमाळ परिसरातील निसर्ग फुलला असून, आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. यात शनिवारी व रविवारी धुक्याच्या वातावरणाने अधिक भर पडली होती. त्यात पर्यटक मनसुराद आनंद लुटताना दिसून आले.

व्यवसाय वाढले

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तोरणमाळ पर्यटन स्थळांवरील व्यावसायिकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पर्यटक पुन्हा तोरणमाळ पर्यटन स्थळाकडे वळू लागल्याने तोरणमाळ येथील व्यावसायिकांना पुन्हा ‘अच्छे दिन’ येत आहेत.