गोरंबा येथे गिम्बदेव पूजन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:53+5:302021-03-06T04:29:53+5:30

आदिवासी समाज जल, जमीन, हवा, सूर्य-चंद्र, प्राणी, पशू पक्षी, लहान लहान जीवजंतूपासून वृक्षवेली यांच्या संतुलनावर सृष्टी शाबूत आहे, असा ...

Gimbadev Pujan ceremony at Goramba | गोरंबा येथे गिम्बदेव पूजन सोहळा

गोरंबा येथे गिम्बदेव पूजन सोहळा

googlenewsNext

आदिवासी समाज जल, जमीन, हवा, सूर्य-चंद्र, प्राणी, पशू पक्षी, लहान लहान जीवजंतूपासून वृक्षवेली यांच्या संतुलनावर सृष्टी शाबूत आहे, असा दृढ विश्वास ठेवतो.

माता फुल्हारदेवी आणि गिम्बदेव यांची पूजा का केली जाते?

वास्तविक बाप गिम्बदेव व आई फुल्हार या नावातच गिम्बदेव पूजनाचा अर्थ दडलेला आहे. गिम्बदेव पूजेत आई फुल्हार पूजनाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. फुल आणि हार हे दोन शब्द संयुक्त आलेले आहेत. फुलाचा अर्थ पुष्प अथवा मोहोर आणि हार या शब्दाचा अर्थ आहे फुलांना नुकतीच फळांची सुरू झालेली लागवड. आता पूजेचा अर्थ थोडक्यात समजून घेऊ या

हे निसर्ग देवता माझं संपूर्ण आयुष्य मुळातच पूर्वापार तुझ्यावर अवलंबून राहिलेलं आहे, अन्न, वस्त्र, निवारा या सर्वच गोष्टी तू मला उपलब्ध करून दिल्या आहेस, म्हणून आज पुन्हा तुला मी विनंती करतोय, गिम्ब महिन्यात महू, आंबे, चारोळी आणखीन इतर सर्व वनस्पतींना सुंदर बहर आलेला आहे. बहरलेली फुल, पान भाज्या म्हणून मला खाता येतील आणि पिकलेल्या फळांचा मला आस्वाद घेता येणार आहे, पण हे सर्व तेव्हा शक्य आहे तू कुठल्याही प्रकारचा प्रकोप होऊ देणार नाही, वादळी वारा, गारपीट, अति उष्णता या सर्वांपासून माझ्या या निसर्ग संपदेला तू वाचव अशी ही आराधना निसर्गात वनस्पती बहरल्यानंतर निसर्ग देवतेला केली जाते. यानंतर मावणं पूजा केली जाते. या वृक्षाला आदिवासी समाजात कल्पवृक्ष मानले जाते. त्यापासून महू सारखे अन्नपदार्थ खाण्यासाठी उपलब्ध होते, तर टोळम्बीपासून तेल काढले जाते? जे खाण्यासाठी व औषध म्हणून देखील वापरले जाते. आणि माहूपासून पूजेसाठी सोकू होरू तयार केला जातो जो पूजनासाठी वापरला जातो, हे झाले गिम्बदेव पूजनाचे वैशिष्ट. पूजा झाल्यानंतर सर्व नागरिक महाप्रसाद घेतात.

धडगाव तालुक्यातील प्रमुख गाव गोरंबा येथे गिम्बदेव पूजन आनंदाने पार पडले जाते. पूर्वजांनी प्राचीन काळापासून घालून दिलेला वारसा रीतीरिवाजाप्रमाणे आजही गोरंबा गावचे लोक जपत आहेत. या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक, पुंजारा हाना हुरता पाडवी, कारभारी धना ईरका वळवी, सुरूपसिंग डेमशा वळवी, गोरजी जाण्या गावीत, सोमाऱ्या भोंग्या वसावे, गोवाल वळवी, तेरक्या हुन्या वळवी, काकड्या वळवी, माल्या मोनसी वळवी, सारपा पाडवी, दामा पाडवी, वनका कडव्या पराडके, कारवाण्या जीवा पिसा वळवी,हारसिंग पाडवी मास्तर, ॲड. अशोक पाडवी, ग्रामपंचायत सदस्य हिरा पाडवी, ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच कांड्या सुन्या पाडवी, पोलीस पाटील कोमल सिंग सुन्या पाडवी, माजी सभापती काळूसिंग सुन्या पाडवी, माजी सरपंच सुन्या बुल्या पाडवी आदी उपस्थित होते.

Web Title: Gimbadev Pujan ceremony at Goramba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.