शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या पैशांच्या वादातून शहाद्यात व्यापा:यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 21:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शेती विक्रीच्या पैशांच्या वादातून जमावाने सोनाराच्या दुकानावर हल्ला दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शहाद्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शेती विक्रीच्या पैशांच्या वादातून जमावाने सोनाराच्या दुकानावर हल्ला दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शहाद्यात बुधवारी दुपारी घडली. याबाबत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. सलीम शेख, शकीला शेख युनूस मक्राणी, शहारूख सलीम व इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, चंद्रशेखर सोनार, रा.शहादा व सलिम शेख यांच्यात 2016 मध्ये शेती खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्या व्यवहारातील पैशांच्या देवानघेवानच्या कारणावरून हा वाद झाला. दुपारी सलीम शेख व त्याची प}ी सोनार यांच्याकडे गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शेख घरी गेला. तेथून त्यांनी इतर चौघांना आणून सोनार यांच्यावर बेस बॉल स्टिकने हल्ला केला. यात चंद्रशेखर सोनार यांच्या हाताचे हाड मोडले. दुकानात असलेल्या सोनार यांच्या आईला ढकलून खाली पाडले. सोनार यांच्या भावाला देखील मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दुकानाचे देखील नुकसान झाले.याबाबत शहरात एकच चर्चा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरिक्षक संजय शुक्ला यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. चंद्रशेखर सोनार यांनी फिर्याद दिल्याने सलीम शेख शकिला शेख युनूस मक्राणी, शहारूख सलीम व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार तारसिंग वळवी करीत   आहे.दरम्यान, पोलिसांनी सलिम शेख, शकिला मक्राणी, शहारूख सलीम व इतर दोघांना ताब्यात घेतले आहे.