मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जाची ‘प्रतिक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:57 IST2020-08-10T12:57:43+5:302020-08-10T12:57:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १४ हजार शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा ...

Freed farmers still 'waiting' for loans | मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जाची ‘प्रतिक्षा’

मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जाची ‘प्रतिक्षा’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १४ हजार शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा आठ जुलै रोजी करण्यात आली होती़ यानुसार शेतकऱ्यांसाठी शासनाने ९९ कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर ही रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात आली होती़ परंतु यानंतर मात्र कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळालेले नाही़
एक महिन्यापूर्वी शासनाने जिल्हा प्रशासनाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनंतर पीक कर्ज वाटपात गती येऊन शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळणे गरजेचे होते़ परंतू आॅगस्ट महिन्याच्या चार तारखेपर्यंत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद असलेले कर्जमुक्त शेतकरी पीककर्जाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले होते़ जिल्हा बँकेने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८८ टक्के कर्ज वाटप केल्याची माहिती देण्यात आली आहे़ मात्र वाटप केलेले कर्ज हे मागील वर्षाच्या नियमित शेतकºयांनाच दिल्याचे सांगण्यात आले आहे़ उर्वरित कर्ज हे विविध कार्यकारी संस्थेच्या सभासदांना देण्यात आले आहे़ यातून शेतकºयांची स्पष्ट संख्या अद्यापही समोर आलेली नाही़ दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज अद्यापही संथ गतीने सुरू आहे़ गेल्या महिन्यात १० टक्के कर्जवाटप करणाºया राष्ट्रीयकृत बँकांची प्रगती ही १५ टक्क्यांपर्यंतच असल्याची माहिती आहे़ दरम्यान कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांना नव्याने कर्ज मिळण्यास बँकांचे कामकाज कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे़ कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांच्या याद्या गावोगावी, बँकांच्या शाखांबाहेर लावण्याचे आदेश होते़ परंतु बँकांनी अशा प्रकारे कारवाई केली नाही़ आॅनलाईन पद्धतीने याद्या प्रसिद्ध केल्या़ परंतु आदिवासी बहुल भागात शेतकºयांना आॅनलाईनेच ज्ञान नसल्याने ‘ते’ कर्जमुक्त झाले याची माहिती उशिराने त्यांच्यापर्यंत पोहोचून नवीन कर्ज मिळण्यापासून ते वंचित राहिले आहेत़

४शासनाकडून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० हजार ११८ लाभार्थी शेतकºयांसाठी ६५ कोटी ५ लाख तर इतर बँकांच्या ३ हजार ८०२ लाभार्थींना ३४ कोटी १९ लाख रुपयांचा निधी देत थकीत खाती निल करण्यात आली आहेत़
४जिल्हा बँकेच्या १० हजार शेतकºयांची खाती निल झाल्याने नियमित चार हजार आणि खाती निल झालेले १० हजार अशा १४ हजार शेतकºयांना पीक कर्ज मिळणे अपेक्षित होते़ परंतू आजअखेरीस केवळ ६ हजार ९९७ शेतकरी आणि २२८ विविध कार्यकारी संस्थांना पिक कर्ज वितरीत करण्यात आला आहे़
बँकेने ५३ कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज शेतकºयांना वाटप केले असून ८८ टक्के कर्ज यंदाच्या हंगामात वाटप केल्याचे सांगण्यात आले आहे़
दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांना यंदा किमान ४५ कोटी ७३ लाख रूपयांचा पीक कर्ज वाटपाचा लक्षांक देण्यात आला होता़ खाजगी, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँक मिळून ही रक्कम ५९ कोटी रूपयांपर्यंत जाणे अपेक्षित होते़ परंतु गेल्या महिन्यात बँकांनी केवळ १० टक्के कर्ज वाटप केले होते़ आतापर्यंत या बँक कर्जवाटपात मागेच आहेत़ सुमारे चार हजार शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप झाल्याचे समजते़

राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँक यांनी कोणत्या पिकासाठी कर्ज वाटप केले हेही यंदा समजून घेणे महत्त्वाचे आहे़ जिल्हा बँकेने बहुतांश शेतकºयांना ऊसासाठी कर्ज दिल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू जिल्ह्यात ऊसाचे हेक्टरी क्षेत्र कमी आहे़ ऊसासाठी शेतकºयांना कर्जाचा पुरवठा हा जादा असायला हवा परंतु बँक मात्र १० ते २० हजार रूपयात कर्ज देऊन शेतकºयांची बोळवण करत आहे़ राज्यातील इतर भागात ऊसाचा पेरा करणाºया शेतकºयांना किमान दीड ते दोन लाख रूपये पीक कर्ज देण्यात येते़

Web Title: Freed farmers still 'waiting' for loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.