बालकाच्या सतर्कतेने ड्रेनेजमध्ये बुडणारी चार वर्षीय बालिका बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:26 PM2019-07-22T12:26:41+5:302019-07-22T12:26:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नवीन भोई गल्लीतील बालवीर चौकात उघडय़ा ड्रेनेजमध्ये पडून चार वर्षीय बालिका बुडत असल्याचे ...

A four-year-old girl who was drowning in the drainage of the child escaped | बालकाच्या सतर्कतेने ड्रेनेजमध्ये बुडणारी चार वर्षीय बालिका बचावली

बालकाच्या सतर्कतेने ड्रेनेजमध्ये बुडणारी चार वर्षीय बालिका बचावली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील नवीन भोई गल्लीतील बालवीर चौकात उघडय़ा ड्रेनेजमध्ये पडून चार वर्षीय बालिका बुडत असल्याचे दिसून आल्यानंतर 12 वर्षीय बालकाने तिला तात्काळ हात देत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली़ रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
नवनाथ टेकडी परिसरातील सांडपाण्याचे वहन करणा:या गटारीचा ढापा बालवीर चौकात आह़े पाण्याचा प्रवीह होत असल्याने हे झाकण उघडे ठेवण्यात आले आह़े सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवनाथ नगरातील यामिनी राकेश भोई ही चार वर्षीय बालिका उघडय़ा ड्रेनेजमध्ये पडली़ तिच्या नाका तोंडात सांडपाणी जात असल्याचे तेथून जाणा:या ओम विनोद चौधरी या बालकाला दिसून आल़े त्याने क्षणाचाही विलंब न लावता बालिकेचा हात धरत तिला खेचून बाहेर काढल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर बालिकेचे वडील राकेश भोई यांच्यासह कुटूंबियांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ तिला नजीकच्या खाजगी दवाखान्यात नेऊन तपासणी करण्यात आल्याची माहिती आह़े तिची प्रकृती ठिक असल्याने सांगण्यात आले आह़े 
भोई गल्लीसह या भागात ठिकठिकाणी ड्रेनेज उघडय़ा राहत असल्याचे दिसून आले आह़े रात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर रस्त्यावर समतल असलेल्या ड्रेनेजमध्ये पडून जिवितहानी होण्याची शक्यता असल्याने नगरपालिकेने ड्रेनेज तातडीने बंद करण्याची मागणी होत आह़े नवनाथ टेकडी परिसरातून वाहणा:या ड्रेनेजमध्ये कायम कचरा अडकत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आह़े याकडे पालिकेने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े 
 

Web Title: A four-year-old girl who was drowning in the drainage of the child escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.