शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

एकाच कुटूंबातील चौघांना डेंग्यूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:18 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात डेंग्यूसदृश तापाची साथ दिवसेंदिवस भीषण होत असून एकाच कुटूंबातील चौघे डेंग्यूची लागण झाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात डेंग्यूसदृश तापाची साथ दिवसेंदिवस भीषण होत असून एकाच कुटूंबातील चौघे डेंग्यूची लागण झाल्याने खाजगी दवाखान्यात दाखल असल्याची घटना समोर आली आह़े खाजगी रुग्णालयांमध्ये किमान सात ते आठ रुग्ण डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने दाखल झाल्याचे रुग्णालयांनी स्पष्ट केले आह़े डेंग्यूची लागण होऊन 18 वर्षीय युवती दगावल्याची घटना आठ ऑक्टोबर रोजी घडली होती़ यानंतरही शहरात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण नव्याने समोर येणे थांबलेले नाही़ अशात शुक्रवारी शहरातील एका खाजगी रुग्णालयात कोरीट रोड परिसरातील लक्ष्मीनगर भागात राहणारे प्रा़ डॉ़ सुभाषकुमार ठाकरे हे डेंग्युसदृश तापाची लागण झाल्याने उपचार घेत असल्याचे समोर आल़े त्यांच्या पत्नी उषाबाई, मुलगा उत्कर्ष व लहान मुलगा रितेश या तिघांनाही डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनाही शहरातील तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल़े एकाच कुटूंबातील चौघांची ही अवस्था दिसून आल्यानंतर शहरात डेंग्यूचा फैलाव हा मोठय़ा प्रमाणात झाल्याचे स्पष्ट होऊनही साथीला अटकाव करण्यात यश आलेले नाही़ शहरातील खाजगी रुग्णालयात डेंग्यूसदृश तापावर उपचार घेऊन 100 पेक्षा अधिक जण घरी परतल्याचे तर तेवढेच रुग्ण पुन्हा नव्याने भरती झाल्याची माहिती आह़े  हिवताप विभागाकडून घरोघरी तपासणी करुन माहिती देण्यात येत असली तरी माहितीच्या पुढे काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आह़े जिल्हा रुग्णालयात सुविधा देण्यात येऊनही रुग्ण उपचारासांठी खाजगी रुग्णालये किंवा धुळे, सुरत शहरात रवाना होत असल्याने आरोग्य यंत्रणा नेमके करतयं तरी काय अशी विचारणा होत आह़े दरम्यान पालिका आरोग्य विभागाने धुरळणीसाठी तीन मशिन मागवत शहरात फवारणीला वेग दिला आह़े 

डेंग्यूसृदश तापाची लागण झाल्याची शहनिशा व्हावी म्हणून शनिवारी आरोग्य यंत्रणेने 30 एमपीडब्ल्यू कर्मचा:यांचे पथक शहरात नियुक्त केले होत़े त्यांच्याकडून रक्तनमुने संकलित करण्यात आले आहेत़ त्यांच्यासोबत आरोग्य विभागाच्या अधिसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका आणि आशा स्वयंसेविका यांच्याकडून शहरात जनजागृती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े यातून डेंग्यूची नेमकी स्थिती रविवारी दुपार्पयत समोर येणार आह़े