लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुकानात बसलेल्या महिलेच्या गळ्यातून एक लाख 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत दोघांनी जबरीने ओढून नेत पोबारा केल्याची घटना शहादा येथे घडली. अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा येथील जशोदा नगरात राहणा:या आशाबाई शांतिलाल तावडे या आपल्या घरासमोरील दुकानात बसलेल्या असतांना दोन अज्ञात युवक त्यांच्याजवळ आले. त्यांना काही कळायच्या आत त्यांच्या गळ्यातून साडेतीन तोळ्याची सोन्याची पोत ओढून घेत पोबारा केला. पोतची किंमत एक लाख 15 हजार 500 रुपये इतकी आहे. महिलेने आरडाओरड केला, परंतु उपयोग झाला नाही. याबाबत आशाबाई शांतिलाल तावडे यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक नजन पाटील करीत आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून धूम स्टाईलने चोरीच्या घटनांना पायबंद बसला होता. आजच्या घटनेमुळे चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिसांनी चोरटय़ांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
शहाद्यात महिलेच्या गळ्यातून जबरीने पोत घेवून दोघांना पोबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:11 IST