नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी चारा वाहतूकीवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:34 IST2018-10-12T12:34:26+5:302018-10-12T12:34:32+5:30

नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी चारा वाहतूकीवर बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात आगामी काळात निर्माण होणा:या चारा टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी चारा वाहतूकीस बंदीचे आदेश काढले आहेत़ गुरुवारी काढलेल्या या आदेशांमुळे पशुपालक आणि शेतक:यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यात दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून पाऊल उचलण्यात आले आह़े
जिल्ह्यातील विविध भागात यंदा केवळ 67 टक्के पावसाची नोंद आह़े जवळपास सर्व तालुके हे दुष्काळाच्या झळा सोसत आहेत़ यात हाती आलेल्या जुजबी पिकांचा चारा साठवणा:या शेतक:यांना जिल्ह्याबाहेर तसेच परराज्यातील चारा खरेदीदार जादा दरांचे अमिष दाखवून चा:याची खरेदी करून घेऊन जात होत़े यामुळे येत्या काळात चारा टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील सहा लाख 95 हजार गुरांच्या चा:याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता होती़ यावर तात्काळ उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याबाहेर चारा घेऊन जाण्यास बंदी घातली आह़े येत्या दोन महिन्यार्पयत या निर्णयाची अंमलबजावणी राहणार असून त्यानंतर निर्णयाला मुदतवाढ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आह़े तळोदा आणि शहादा तालुक्यातून गुजरात व मध्यप्रदेशात चारा विक्री वाढल्याचे सातत्याने दिसून येत होत़े मका, ज्वारी सोयाबीनच्या कडब्यासह भूईमूग आणि सोयाबीनचा पाला खरेदी करण्यात येत होता़ माफक 2 ते 3 हजार रूपयात एक ट्रॉली भरून या चा:याची विक्री सुरु झाली होती़ शेतक:यांना चारा विक्रीतून पैसे मिळत असले तरी येत्या काळात यातून चाराटंचाई निर्माण होणार आह़े यातून चारा छावणी निर्माण करण्याचे संकट उद्भवू नये यासाठी ही तातडीची उपाययोजना आह़े चारा वाहतूक केल्यास संबधितांवर आदेशांप्रमाणे गुन्हाही दाखल होऊ शकतो़ जिल्हा प्रशासनाकडून चाराटंचाईपूर्वी बुधवारी संभाव्य पाणीटंचाईबाबत आराखडा तयार करण्यावर प्राथमिक चर्चा झाली आह़े आजअखेरीस जिल्ह्यातील 250 गावे ही पाणीटंचाईग्रस्त आहेत़ या गावांमधील स्थितीचा आढावा स्थानिकस्तरावरील कर्मचा:यांकडून जाणून घेत ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानचा पहिला पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आह़े या आराखडय़ात 81 गावांचा समावेश करण्यात आला आह़े टंचाईग्रस्त असलेली ही गावे दुष्काळग्रस्तच असल्याने त्याठिकाणी टंचाईनिवारणाची कामे होणार आहेत़ यासाठी प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आह़े संबधित ग्रामपंचायतींचा त्यात सहभाग राहणार आह़े सर्व 81 या गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण, पुर्नभरणाची कामे युद्धपातळीवर होणार आहेत़
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील दोन बॅरेज आणि तीन मध्यम प्रकल्पांसह 37 लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा आरक्षित करण्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती आह़े या पाश्र्वभूमीवर जिल्हा दुष्काळी घोषित करण्याची प्रक्रिया नजीक येऊन ठेपल्याचे सांगण्यात येत आह़े चारा वाहतूक बंदीचा सर्वाधिक लाभ नंदुरबार तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांना होणार आह़े पूर्णपणे दुष्काळी असलेल्या या तालुक्यातील शेतकरी तळोदा आणि शहादा तालुक्यातून चारा खरेदी करून आणत होत़े परंतू परराज्यातील व्यापारी त्यांच्यापेक्षा अधिक दर देत असल्याने अनेकवेळा शेतकरी चारा नसल्याचे सांगून नंदुरबार तालुक्याच्या शेतक:यांना माघारी पाठवत होत़े
जिल्हाधिकारी यांच्याकडून स्थलांतरांच्या प्रश्नावरही कामकाज सुरू करण्यात आले असून येत्या काळात सुरु करण्यात येणारी जलयुक्त शिवार योजनेतील कामे कृषी विभागातील विविध कामे रोहयोच्या माध्यमातून करण्याचे सुचवण्यात आले आह़े तसेच नरेगांतर्गत सीसीटी, मजगी, कंपार्टमेंट बंडींग, नाला खोलीकरण, पाझर तलावातून गाळ उपसणे याद्वारे मजूरांना काम देण्यात येणार आह़े रोहयोकडून संभाव्य गांवांचे आढावा सव्रेक्षण सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर उपाययोजनांना वेग येणार आह़े