शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३५ हजार कोरोना योद्ध्यांना मिळाला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

नंदुरबार : कोरोनाबाधितांसाठी काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि विविध यंत्रणेतील कर्मचारी यांचे प्रथम लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

नंदुरबार : कोरोनाबाधितांसाठी काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि विविध यंत्रणेतील कर्मचारी यांचे प्रथम लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, जिल्ह्यात सध्या कामकाज सुरू आहे. यातून आजवर ३५ हजार हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना पहिला डोस दिला गेला असून, १६ हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांत या कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना लसीकरणासाठी निरोप देत, लस घेण्यास पाचारण करण्यात आले होते. यातून लसीकरणाचा जिल्ह्याचा टक्का वाढला असून, बहुतांश कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध भागांत काम करणारे हे कर्मचारी निरोगी राहून सक्रिय राहावेत, यासाठी त्यांच्या आरोग्याची माहिती घेत टप्प्याटप्प्याने लसीकरण पूर्ण करण्यात येत होते. आरोग्य, महसूल, पोलीस, नगरपालिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यासह विविध शाखांमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वच कर्मचाऱ्यांच्या नोंदण्या करण्यात आल्यानंतर, त्यांना कोविशिल्डचे डोस देण्यात येत होते. यातून आजघडीस इतर जिल्ह्यांत लसीचा तुटवडा असल्याने जिल्ह्यात मात्र ५० हजार डोस उपलब्ध आहेत. यातून सर्व कर्मचाऱ्यांना दुसरा डोस सहज मिळणार असून, इतर वयोगटांनाही लसींचे डोस देण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लसीकरणानंतर एकही कर्मचारी बाधित नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात आरोग्य कर्मचारींचे १११ तर फ्रंटलाइन वर्कर्सचे एकूण २०० टक्के लसीकरण झाल्याचे सांगण्यात आहे. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण केल्यानंतरही सातत्याने त्यांच्या नोंदण्या सुरू राहिल्या होत्या. यातून ३५ हजार ९४९ आरोग्य व फ्रंटलाइन कर्मचारी यांचे लसीकरण झाले आहे. सर्वच तालुक्यात काम करणारे कर्मचारी पुढे येत आहेत. या सर्वांचा पहिला डोस पूर्ण झाला असून, १६ हजार ६२७ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.