शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त ट्रकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:28 IST

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी तामिळनाडूहून सुरतकडे ट्रक (क्रमांक टी. एन.५२ आर- ३७६६) कपड्याने भरलेल्या गाठी घेऊन जात ...

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी तामिळनाडूहून सुरतकडे ट्रक (क्रमांक टी. एन.५२ आर- ३७६६) कपड्याने भरलेल्या गाठी घेऊन जात असताना, ट्रकचालकाचा भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनावरील ताबा सुटला. अशातच हा मालट्रक महामार्गावरील दुभाजकावर आदळून उलटला. भरदुपारी उन्हात हा ट्रक उलटल्याने घर्षण होऊन ट्रकने क्षणात पेट घेतला. ट्रकमध्ये कापडाच्या गाठी असल्याने मालट्रकने पेट घेऊन आगीने रौद्ररूप धारण केले.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्रावरील सहायक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लोंढे, पो.कॉ. दीपक चौधरी, राकेश भामरे, महेश बच्छाव तसेच विसरवाडीचे पोलीस पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेले चालक व सहचालक यांना ट्रकमधून बाहेर काढले व विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील चालक सिंधील मनी (वय २५, रा. सेलम, तामिळनाडू) हा गंभीर भाजला गेल्याने त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तेथे उपचार घेत असताना त्याची प्राणज्योत मालवली; तर सहचालक गंभीर जखमी आहे. आग आटाेक्यात आणण्यासाठी नवापूरहून अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत.