अखेर शेवाळी ते नेत्रंग महामार्ग दुरूस्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:00 PM2020-10-27T13:00:28+5:302020-10-27T13:00:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दीर्घ काळापासून खड्ड्यांत गेलेल्या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. लोकमतने ...

Finally, repair work of Shewali to Netrang highway started | अखेर शेवाळी ते नेत्रंग महामार्ग दुरूस्तीला सुरुवात

अखेर शेवाळी ते नेत्रंग महामार्ग दुरूस्तीला सुरुवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दीर्घ काळापासून खड्ड्यांत गेलेल्या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर महामार्ग विभागाने मार्गाची दुरूस्ती सुरू केली असून नंदुरबार शहरातील करण चाैफुली ते अक्कलकुवा तालुक्यात गुजरात हद्दीपर्यंत काम सुरू झाले आहे.       
 ७५३ बी अर्थात शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था या मार्गाने प्रवास करणार्यांना अपघातांच्या खाईत लोटत होती. याबाबत राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्यासह अनेकांनी आंदोलने करुनही बांधकाम विभाग दाद देत नव्हता. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून महामार्गाची देखभाल आणि दुरूस्ती करण्यासाठी गेल्या वर्षात ३७ कोटी रूपये मंजूर करुनही काम लांबले होते. कधी कोरोना तर कधी पावसाळ्याचे कारण देत कामाला ब्रेक दिला होता. दरम्यान या काळात नंदुरबार शहरातील करण चाैफुली ते तळोदा जवळ हाताेडा पूल ह्या अंतरात मोठमोठे खड्डे पडून वाहतूक करणे जिकिरीचे झाले होते. याबाबत नागरीकांनी आंदोलन केली होती. 
लोकमतने सातत्याने वृत्त मालिका करुन संबधित कामाची स्थिती समोर आणली होती. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सोमवारी सकाळपासून करण चाैफुलीपासून डांबरीकरण करुन खड्डे भरण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

तीन टप्प्यात होणार दुरूस्तीचे काम 
जिल्ह्यातून १११ किलोमीटर अंतर कापणार्या महामार्गाची नंदुरबार ते अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात हद्दीपर्यंत दुरूस्तीचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. यांतर्गत तीन ठेकेदार नियुक्त करुन काम सुरू करण्यात आले आहे. नंदुरबार ते हातोडा पूल दरम्यान ६ कोटी, तळोदा ते अक्कलकुवा अंतरासाठी १३ कोटी तर अक्कलकुवा ते गुजरात हद्दीसाठी १० कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यांतर्गत रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे काम दीर्घकाळ टिकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

Web Title: Finally, repair work of Shewali to Netrang highway started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.