शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचन योजना कार्यान्वित व्हावे यासाठी जलसमाधी घेणार असल्याचा शेतकऱ्यांचा शासनाला इशारा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST

तापी काठावरील २२ उपसा सिंचन योजना कार्यान्वित व्हाव्या यासाठी याआधीही २० ऑक्टोबर २०२० रोजी संबंधित योजनांचे पदाधिकारी व शेतकरी ...

तापी काठावरील २२ उपसा सिंचन योजना कार्यान्वित व्हाव्या यासाठी याआधीही २० ऑक्टोबर २०२० रोजी संबंधित योजनांचे पदाधिकारी व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनावजा विनंतीवरून योजनांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते.

२० ऑक्टोबर २०२०रोजी नंदुरबार मध्यम प्रकल्प नंदूरबार येथे संबंधित विभागाच्या अधीक्षक अभियंता धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे पदाधिकारींनी चर्चा केली होती तरी यावेळी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत नंदूरबार व धुळे जिल्ह्यातील तापीकाठावरील २२ उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांचा सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल शासनस्तरावर सादर करून मंजूर करून घेण्यात येऊन उर्वरित कामांना तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार २० ऑक्टोबर २०२० रोजी होऊ घातलेल्या आमरण उपोषणास स्थगिती दिली होती; परंतु शासनस्तरावर आतापर्यंत कुठलीही सकारात्मक कार्यवाही होताना दिसत नाही म्हणून २२ उपसा सिंचन योजनांचे शेतकरी हवालदिल झाले असून, शासन आपल्या वाजवी मागणीकडे कानाडोळा करत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित योजनांचे पदाधिकारी व शेतकरी हे दिनांक १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता प्रकाशा बॅरीज येथे जलसमाधी घेणार आहेत तरी याची तातडीने नोंद घ्यावी अन्यथा पुढील परिणामास शासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

उपसा सिंचन योजनांबाबत शासनस्तरावर कुठलीही सकारात्मक कार्यवाही होताना दिसत नसल्याने शासनाचे लक्ष संबंधित योजनांकडे वेधले जावे यासाठी जलसमाधी घेणारे शेतकरी जिजाबराव गोरख पाटील धमाने, विजय महेंद्रलाल गुजराती कोपर्ली, यशवंत लिंबाजी पाटील, राजाराम दगडू पाटील, रवींद्र उत्तम पाटील कहाटूळ, संजय लक्ष्‍मण पाटील शिरूळ, रितेश खेमराज बोरसे कळंबू, विनोद चिंतामण पाटील पुसनद, सखाराम राजाराम चौधरी, यशवंत जगन्नाथ पाटील लहान शहादे, रवींद्र शंकर पाटील शिंदे, राजेंद्र विलास पाटील खोडसगाव हे शेतकऱी जलसमाधी घेणार असून, त्यांनी निवेदनात आपली नावे दिली आहेत.