शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातही स्वॅबचे नमुने घेण्याची आजपासून सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील कोरोना विषाणू संशयित नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठीचे नमुने शहाद्यात घेण्याची सुविधा शासनाच्या वतीने करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील कोरोना विषाणू संशयित नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठीचे नमुने शहाद्यात घेण्याची सुविधा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. गुुरुवारपासून ते सुरू होणार आहे. बुधवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी शहाद्याला भेट देऊन पाहणी केली.आतापर्यंत शहरातील ६३ नागरिकांचा अहवाल प्राप्त झाला असून पैकी ५४ अहवाल निगेटिव्ह आले असून नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे त्यातील एक मयत झाला असल्याची माहिती प्रांत अधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिली.शहरात कोरोना चे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी एका दिवशी सर्वाधिक पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ही सर्वाधिक संख्या असल्याने प्रशासनातर्फे कोरोनाची साखळी वाढू नये यासाठी विशेष खबरदारी बाळगली जात आहे रुग्ण संख्या वाढल्याने आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये यांनी शहाद्याला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली क्वारंटाईन कक्षाची ही पाहणी केली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या.यापूर्वी संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठवावे लागत होते. गुरुवारपासून शहाद्यात संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याची सुविधा शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाचा वेळ वाचणार आहे व अहवाल लवकर उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.