शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रमजान महिन्यातही केळीला भाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

मागील वर्षाच्या लॉकडाऊनप्रमाणेच यावर्षीही केळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एकाच प्रकारच्या पिकाला वेगवेगळ्या ठिकाणी ...

मागील वर्षाच्या लॉकडाऊनप्रमाणेच यावर्षीही केळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एकाच प्रकारच्या पिकाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाव भेटत असल्यामुळे यावर काहीतरी उपाय योजना करायला हवेत, असे सूरही शेतकऱ्यांमधून ऐकायला भेटत आहेत.

सध्या रमजानचा महिना चालू आहे. त्यामुळे केळीला सर्वांकडे मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. तरीही शहादा परिसरात व्यापाऱ्यांकडून केळी पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. उत्तर भारतात तर खान्देशची केळी मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते. जळगाव, रावेर, बुऱ्हानपूर येथे सध्या केळीला व्यापाऱ्यांकडून सार्वधिक १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे. मात्र, शहादा परिसरात व्यापारी लॉकडाऊनच्या नावाखाली नवती केळीला ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आणि पिलबागला ५०० ते ६०० प्रतिक्विंटल असा भाव देत आहेत.

शेतकरी व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी मिळत असलेले जादा दर सांगतात. मात्र, व्यापारी सध्या लॉकडाऊनचे कारण पुढे करून कमी भावात शेतकऱ्यांची केळी खरेदी करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून, रमजान महिना असल्यामुळे केळीला अधिक मागणी होताना दिसत असून, व्यापारी सर्वांकडे केळी खरेदी करताना दिसून येत आहेत. मागणी सर्वांकडे सारखीच दिसून येत असून, दरही सर्वांकडे सारखाच मिळायला पाहिजे. अशी योजना शासनाने राबवायला हवी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.