शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा युवा महोत्सवात यंदाही अपेक्षा भंग तीन कला प्रकारात आले फक्त पाच संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात २३ पैकी तीनच कला प्रकारात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात २३ पैकी तीनच कला प्रकारात स्पर्धकांनी हजेरी लावल्याने क्रीडा विभागाचा उदासिन कारभार समोर आला आहे़ शहरातील हिग़ो़श्रॉफ हायस्कूलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली़क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या या महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेत २, एकांकिका स्पर्धेत १ तर वक्तृत्व स्पर्धेत दोन स्पर्धकांनी सहभाग नोंदवला़ १५ ते २९ वयोगटातील या स्पर्धकांनी महोत्सवात कला सादर केली़ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गेल्या १० वर्षांपासून होत असलेल्या या स्पर्धेची नंदुरबार जिल्ह्यात स्थिती अत्यंत दयनीय आहे़ नावाला होणाऱ्या या महोत्सवासाठी विभागाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे वेळावेळी समोर आले आहे़ गेल्या वर्षी स्पर्धकांअभावी महोत्सव दोनवेळा पुढे ढकलण्याची वेळ क्रीडा अधिकाऱ्यांवर आली होती़ हाच प्रकार यंदाही होण्याची शक्यता होती़ परंतू उपस्थित असलेल्या स्पर्धकांना सोबत घेत घाईने स्पर्धा उरकण्याचा प्रकार विभागाने केल्याने उपस्थित परीक्षकांनीही नाराजी व्यक्त केली़ कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी न केल्याने जिल्ह्यातील बºयाच शाळा महाविद्यालयात महोत्सवाबाबत माहितीच मिळालेली नाही़ विशेष म्हणजे महोत्सव झाल्याचा खर्च शासनाकडून वसुल होत आहे़महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले़ प्रसंगी हास्य कलावंत विजय पवार, नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर, युवराज पाटील, फकीरा माळी, विकी परदेशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले़ महोत्सवात श्रॉफ हायस्कूल, शासकीय निवासी शाळा, जिजामाता महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवला़ सूत्रसंचालन हरीश चौधरी यांनी तर आभार जगदीश चौधरी यांनी मानले़ यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले़