शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत मजुरांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या निर्देशानुसार राज्यात व परराज्यात विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या निर्देशानुसार राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या आदिवासी मजूर आणि विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.हे नियंत्रण कक्ष जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणार असून, तेथून मिळालेल्या आदिवासी व्यक्तिंच्या माहितीच्या आधारे वाहन व्यवस्था करून त्यांना जिल्ह्यातील त्यांच्या गावी पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी तळोदा आणि नंदुरबार प्रकल्प कार्यालय परस्पर समन्वयाने कार्य करीत आहे. राज्यातील तसेच परराज्यात असलेल्या जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांची माहिती संकलनाचे कामदेखील करण्यात येत आहे.या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार व तळोदा यांच्या समन्वयातुन तालुका निहाय सहा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यासाठी दोन्ही प्रकल्पातील ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वांना तेथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे, तसेच जेथे बस जाणार नाही तेथे खाजगी वाहनाद्वारे मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यात येणार आहे.नियत्रंण कक्षात नंदुरबार, नवापुर व शहादा तालुक्यासाठी समन्वय अधिकारी सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून प्रदीप देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. तळोदा, अक्कलकुवा व धडगावसाठी सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात किंवा परराज्यात स्थलांतरीत अथवा लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या आदिवासी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.