ईदची नमाज सामुहिक ऐवजी यंदा प्रथमच होणार घराघरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:06 PM2020-05-23T12:06:52+5:302020-05-23T12:06:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेले लॉकडाउन व संचारबंदी पाहता यंदा मुस्लीम समाज बांधवांना रमजान इदची नमाज ...

 Eid prayers will be held at home for the first time this year instead of in groups | ईदची नमाज सामुहिक ऐवजी यंदा प्रथमच होणार घराघरात

ईदची नमाज सामुहिक ऐवजी यंदा प्रथमच होणार घराघरात

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेले लॉकडाउन व संचारबंदी पाहता यंदा मुस्लीम समाज बांधवांना रमजान इदची नमाज सामुहिकपणे अदा करता येणार नसल्याचे चित्र आहे. प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे. रमजानच्या पवित्र पर्वाची सांगता रविवारी किंवा सोमवारी होणार आहे.
रमजान मासास इस्लाम धर्मात अनन्य साधारण असे महत्व आहे. एक महिन्याचे उपवास करुन अल्लाहला राजी करण्याचा प्रयत्न या महिन्यात मुस्लिम समाजबांधव करीत असतात. बालकांपासुन वयोवृध्द अश्या सर्व वयोगटातील नागरिक रोजा करुन पाचही वेळची नमाज कसोशीने अदा करतात. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पाचपेक्षा जास्त लोकांचे एकत्रित येणे हितावह नसल्याने पहिल्यांदा रमजान महिन्यात रात्रीच्या वेळेस समाजबांधव एकत्रित येउन अदा होणारी तरावीहची नमाज अदा करता आली नाही.
कोरोनामुळे सामाजिक दुरी ठेवणे आवश्यक असल्याने यंदा संपुर्ण दिवसातील पाचवेळची नमाज समाजबांधवांकडुन घरीच अदा करण्यात आली. इतर सर्व सोपस्करही घरात राहुनच पार पाडुन अल्लाहला राजी करण्याचा व कोरोनाच्या जिवघेण्या संकटापासुन जगाला मुक्त करण्यासाठी घराघरातुन प्रार्थना करण्यात आली.
चंद्रदर्शन पासुन सुरुवात होणार्या या मासाची सांगता देखील चंद्रदर्शनानेच होते. चंद्रदर्शनास यामुळे खुप महत्व आहे. २९ उपवासानंतर होणारे चंद्रदर्शन काही ठिकाणी होते व काही ठिकाणी होत नाही. मासातील ३० उपवास पुर्ण झाल्यास चंद्रदर्शन होवो किंवा न होवो, ईद साजरी होतेच. मात्र २९ रोजे पुर्ण झाल्यावर साजरी होणारी ईद पुर्णत: चंद्रदर्शनावरच अवलंबुन असते. प्रत्येक शहराला लागुन असलेल्या ईदगाह मैदानावर एकत्रित येऊन ईदची नमाज अदा करण्याची पुवार्पार परंपरा आहे. यंदा सामुहिकपणे ईदची नमाज देखील अदा होणार नसल्याने चिंता वाढल्या आहेत. लॉकडाउनच्या धर्तीवर यंदा या सर्व बाबी शक्य नसल्याने उत्साहावर विरजण पडले आहे. ईदच्या नमाजमधे कुतबारुपी परमेश्वराच्या संदेशाचे वाचन करण्याची परंपरा पैगंबरांपासुन सुरु असल्याने कुतबा ईदच्या नमाजमधील अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला कुतबा पठण करणे अवघड असते. हाफेज, मुफ्ती व आलीम दर्जाचे आगेवान हे कार्य पार पाडतात. या सर्व बाबी एकत्रितपणे नमाज अदा करण्यावेळी शक्य होते.

 

Web Title:  Eid prayers will be held at home for the first time this year instead of in groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.