शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाबाधितांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न : ॲड. के. सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, ...

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

ॲड. पाडवी म्हणाले, प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार त्वरित रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी करण्यात यावी. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी कोणत्याही प्रकारची औषधे किंवा सुविधांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हा रुग्णालयातील तिसऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करून वाढीव खाटांची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. संचारबंदी कालावधीतील नियमांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे आणि पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

नागरिक अनावश्यक बाहेर फिरणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. भाजी विक्रेत्यांना विविध ठिकाणी जागा निश्चित करून द्यावी. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. प्रशासनातील विविध विभाग चांगले काम करीत आहे. कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रकृतीचीदेखील काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, असे ॲड. पाडवी म्हणाले.

विरारची घटना वेदनादायी आणि दु:खद आहे. अशा घटना घडू नये यासाठी रुग्णालयांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात. रुग्णांच्या उपचारासोबत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. रुग्णालय सुरक्षा उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.