शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

आधीचे ३० टक्के टार्गेट पूर्ण : १ मेपासून १८ वर्षांपुढील १२ लाख जणांना मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यात आधीचे ३० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले असून आता १ मेपासून १८ वर्षे वयापुढील जवळपास १२ ...

नंदुरबार : जिल्ह्यात आधीचे ३० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले असून आता १ मेपासून १८ वर्षे वयापुढील जवळपास १२ लाख जणांना लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात येत असून यासाठी एक लाख डोसची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २० टक्के जणांनी लसीकरण केले नव्हते. ते आता पूर्ण करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनाही लसीकरण करण्यात आले. ४५ वर्षे वयापुढील नागरिकांना लसीकरणाचा निर्णय झाल्यानंतर वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यातील गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून आता १८ वर्षे वयापुढील १२ लाख जणांना जिल्ह्यात लसीकरण करण्यात येणार आहे.

मे महिन्यात वेग वाढणार...

एकूण ११ हजार ७३८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा, तर सहा हजार ७०३ कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

कोरोनायोद्धा यापैकी १४ हजार ३२७ व्यक्तींना पहिली, तर सहा हजार ३१६ व्यक्तींना दुसरी मात्रा देण्यात आली.

४५ ते ६० वयोगटांतील व्यक्तींपैकी २५ हजार ३७ व्यक्तींना पहिली तर तीन हजार ३५५ ना दुसरा डोस देण्यात आला.

६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या २८ हजार २८४ ज्येष्ठ नागरिकांना पहिली आणि पाच हजार २७२ ज्येष्ठ नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

एकूण ७९ हजार ३८६ व्यक्तींना लसीची पहिली मात्रा, तर २१ हजार ६४६ व्यक्तींना दुसरी मात्रा अशा एकूण एक लाख एक हजार ३२ चा टप्पा पार झाला.

जिल्ह्यात १ मेपासून लसीकरणाचे केंद्र वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

जास्तीत जास्त जणांचे लसीकरण व्हावे यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे.

एक लाख डोसची मागणी नोंदविण्यात आली असून ते मिळाल्यावर लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

ग्रामीण भाग उदासीन

लसीकरणासाठी ग्रामीण भाग उदासीन असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरी भागातच लसीकरणाला वेग आलेला दिसत आहे. प्रशासनाने ग्रामीण भागात विशेष जनजागृती केली असून शिबिरेही घेतली जात आहेत. त्यामुळे वेग वाढत आहे.