मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिका इमारतीचे ई भुमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:25 IST2020-11-07T12:25:28+5:302020-11-07T12:25:37+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या अद्ययावत इमारतीचे भुमिपूजन, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिका इमारतीचे ई भुमिपूजन
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिकेच्या अद्ययावत इमारतीचे भुमिपूजन, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी दुपारी १ वाजता ॲानलाईन पद्धतीने करणार आहे. त्याचा लाईव्ह सोहळा नाट्यमंदीरात निमंत्रीतांच्या उपस्थितीत होणार असून मुख्यमंत्री ठाकरे संबोधीत करणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
रघुवंशी यांनी सांगितले, या दोन्ही कामांचे भुमिपूजन तसेच उद्घाटन आठ महिन्यांपूर्वी करण्यात येणार होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौराही निश्चित झाला होता. परंतु परिवारात दु:खद घटना घडल्याने तो कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव, लॅाकडाऊन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा होऊ शकला नाही.
त्यामुळे हा सोहळा ॲानलाईन पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला मान्यता दिली. त्यामुळे रविवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मा अद्ययावत इमारतीचे भुमिपूजन, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यानंतर ते जनतेला संबोधीत करणार आहेत.
या सर्व सोहळ्याचे प्रेक्षेपण नाट्यगृहात लावण्यात येणा-या एलईडीवर करण्यात येणार आहे. केवळ निमंत्रीतांसाठी हा सोहळा राहणार आहे.
पालिकेची इमारत न्यायालयाच्या जुन्या जागेवर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी एकुण २३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दोन वर्षात ही इमारत बांधून पुर्ण होणार आहे. जलतरण तलाव देखील ॲालम्पीक स्पर्धांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. त्याला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.
मॅा-बेटी गार्डनला मिनाताई ठाकरे नाव
n पालिकेतरर्फे एक कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या मॅा-बेटी गार्डनला मॅासाहेब स्व.मिनाताई ठाकरे मॅा-बेटी गार्डन असे नाव देण्याचे निश्चित झाले असल्याचे चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. या गार्डनमध्ये केवळ महिला आणि मुलींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तरुणींना प्रेरणादायी ठरणाऱ्या दहा कर्तूत्ववान महिलांचे शिल्प देखील बसविण्यात येणार असून लवकरच त्याचेही उद्घाटन करण्यात येणार असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.