Dutt Jubilee Week ends at Swami Samarth Center | स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सप्ताहाचा समारोप
स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सप्ताहाचा समारोप


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील स्वामी समर्थ केंद्रात सुरु असलेल्या दत्त जयंती सप्ताहाचा समारोप करण्यात आला़ सप्ताहांतर्गत झालेल्या विविध धार्मिक उपक्रमांमध्ये शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला़
५ डिसेंबरपासून सुरु झालेल्या या सप्ताहांतर्गत गणेश याग, चंडी याग, स्वामी याग, विष्णू याग, रुद्र याग, मल्हारी सप्तशती आदी विशेष यागांद्वारे सेवेकऱ्यांनी सेवा दिली़ दरम्यानच्या काळात चौपाळे येथील सेंद्रीय शेती प्रकल्प व शहरातील केंद्रात गुरुचरित्र पारायण, दुर्गा सप्तशतीचे पाठ, स्वामी चरित्र सारामृत पारायण, मल्हारी सप्तशती पाठ, स्वामी समर्थ मंत्र जप, नवार्णव मंत्र जप, गायत्री मंत्र जप या सह महामृत्यंजय जप करण्यात आले़
दत्तजयंतीनिमित्त जन्मोत्सव साजरा करुन महाआरती करण्यात आली़ या सप्ताहात दीड हजार सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता़ समारोपप्रसंगी महानैवेद्य, आरती, श्री़सत्यदत्त पूजन करुन शिºयाचा प्रसाद देण्यात आला़

Web Title: Dutt Jubilee Week ends at Swami Samarth Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.