प्रकाशा येथे धुरळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:24 IST2019-12-20T12:24:12+5:302019-12-20T12:24:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्यानंतर गावात आरोग्य विभागामार्फत आठ टीम तीन ...

Dusting at the light | प्रकाशा येथे धुरळणी

प्रकाशा येथे धुरळणी

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्यानंतर गावात आरोग्य विभागामार्फत आठ टीम तीन करून सर्वे करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनेही चार फोगिंग मशीनद्वारे धुरळणीला सुरुवात केली आहे.
प्रकाशा येथील गुप्तेश्वर मंदिर परिसरात व आठवडे बाजारात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशीही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पाहणी सुरु केली आहे. गुरुवारीही इतर डासांसह डेंग्यूचे डास व अळ्या आढळून आल्या.स्वत: जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.आर.बी. ढोले यांनी पथकासह प्रकाशा गावाला भेट दिली सर्व्हे केला. डॉ.ढोले यांनी स्वच्छता, पाणी साठवण करण्याची जागा, साठवलेल्या पाणी अळ्या आहेत का? आदींची पाहणी करून ग्रामस्थांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले व जनजागृतीचे पत्रक घरोघरी वाटप केले. ग्रामपंचायतीने उघड्या गटारी बंद करून गावाच्या आजूबाजूला जे ढबके आहेत ते बंद केले पाहिजेत, अशी सूचनाही त्यांनी ग्रामपंचायतीला दिली. कीटक समारक्षक अधिकारी किरण घाटबळे यांनीही गावातील काही घरातून एडिस आणि इतर डास पकडले आहे.
प्रकाशा ग्रामपंचायतीतर्फे सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील यांनीही डेंगू सदृश्य परिस्थिती पाहता गावात चार फॉगिंग मशीनद्वारे फवारणीला सुरुवात केली. ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी सांगितले की, येत्या गुरुवारी पूर्ण प्रकाशा गावात कोरडा दिवस पाळण्यात येणार असून त्यासंदर्भात आतापासूनच ग्रामपंचायतीकडून माहिती देण्यात येत आहे.

Web Title: Dusting at the light