शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांच्या आडमुठेपणामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यानी १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानावर बंदी ...

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यानी १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानावर बंदी आहे. यादरम्यान भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी पालिकेकडून नियोजनही करण्यात आले असून या विक्रेत्यांना चिनोदा रोडवरील कचरा डेपोसमोरील मोकळ्या जागेत दुकान लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. लॉकडाऊन काळात भाजीपाला व फळविक्रेत्यांनी याच जागेवर आपली दुकाने लावण्याचे बंधनकारक होते, असे प्रशासनाच्या वतीने आवाहनही करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता या विक्रेत्यांनी जुन्या जागेवरच म्हणजे स्मारक चौक, भन्साली प्लाझा,ब सस्थानक रोड या ठिकाणीच आपली दुकाने लावली होती. एवढेच नाही तर भन्साली प्लाझाच्या आजूबाजूच्या परिसरात व बसस्थानक रस्त्यावर वाहतुकीला अळथळा ठरेल अशा मधोमध जागेवर लावली होती. त्यामुळे अशा मुजोर फळविक्रेत्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

विक्रेत्यांच्या या आडमुठेपणामुळे या ठिकाणी गर्दी व सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडलेला दिसून आला . शासनाच्या वतीने कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’ला ब्रेक कसा मिळेल? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असतात. तर शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे पालन करण्यात येते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाही फळविक्रेत्यांची अशी मनमानी न समजणारी आहे. सर्वसामान्य ग्राहक फळे व भाजीपाला खरेदीसाठी कचरा डेपो समोरील पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर विना तक्रार जात आहेत. तरीही या विक्रेत्यांचा उतावीळपणा धोकादायक आहे. यादरम्यान प्रशासनाला विक्रेत्यांनी बंदी असलेल्या जागेवर दुकाने लावल्याची बाब लक्षात आल्यावर प्रशासनाच्या वतीने अधिकारी या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता या विक्रेत्यांनी आपल्या हातगाड्यांसह तेथून पळ काढला. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करता आली नाही.