शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

नंदुरबारात अत्यल्प साठय़ामुळे पाणीकपात लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:23 PM

नंदुरबार : विरचक प्रकल्पातील अवघा 12 टक्के पाणीसाठा लक्षात घेता नंदुरबारकरांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. साधारणत: 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. त्यादृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. सुदैवाने येत्या काही दिवसात दमदार पाऊस झालाच तर पाणी कपातीचे संकट टळू शकणार आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्पातील ...

नंदुरबार : विरचक प्रकल्पातील अवघा 12 टक्के पाणीसाठा लक्षात घेता नंदुरबारकरांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. साधारणत: 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. त्यादृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. सुदैवाने येत्या काही दिवसात दमदार पाऊस झालाच तर पाणी कपातीचे संकट टळू शकणार आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्पातील पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी पंपींग स्टेशन आणि जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची क्षमता लक्षात घेता 50 टक्के प्रकल्प भरला तरी वर्षभर पाणी टंचाईची समस्या दूर होते. गेल्या वर्षी प्रकल्प 41 टक्के भरला होता. त्यामुळे वर्षभर पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही. परंतु पावसाळ्याचे दोन महिने झाले तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने आणि त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा होऊ न शकल्याने आता नंदुरबारकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. मृत व जिवंत साठाप्रकल्पात सद्य स्थितीत 12 टक्के जिवंत तर 18 टक्के मृत साठा आहे. पालिकेसाठी धरणातील 4.60 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा राखीव असतो. सध्याचा 7.65 दशलक्ष घनमिटर साठय़ातील तेवढा साठा पालिकेचा हिस्स्याचा आहे. परंतु त्यात मृत साठय़ाचा देखील समावेश आहे. जर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील पुरेसा पाऊस झालाच नाही तर पुढील काळात नंदुरबारकरांसमोर मोठी समस्या वाढून ठेवली आहे. ही बाब लक्षात घेता आतापासूनच आहे तो पाणीसाठा काटकसरीने वापरल्यास पुढील काळातील टंचाई काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. त्यादृष्टीने आता पालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.सद्याचा पाणीपुरवठासध्या एक दिवसाआड 45 ते 60 मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. जो शहरवासीयांच्या दृष्टीने पुरेसा आहे. प्रत्येक झोननिहाय हा पाणीपुरवठा केला जातो. कधी तांत्रिक समस्या उद्भवलीच तर त्यात खंड पडतो. अन्यथा नियमितपणे अशाच पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेचे असते. याशिवाय पालिका शासकीय कार्यालये, शासकीय वसाहती यांना मिटरप्रमाणे पाणीपुरवठा करीत असते.20 ते 25 मिनिटे कपातसद्याचा पाणीसाठा लक्षात घेता येत्या चार ते पाच दिवसापासून किमान 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. पाणपुरवठा विभाग आणि पाटबंधारे विभाग यांनी आणखी वेगळाच अहवाल दिला तर दोन दिवसाआड 45 ते 50 मिनिटे पाणीपुरवठा करणे असाही एक पर्याय राहणार आहे. परंतु दोन दिवसाआड पाणीपुरवठय़ाला शहरवासयांचा विरोध असू शकतो. त्यामुळे आहे त्या वेळेतच 20 ते 25 मिनिटांची कपात या पर्यायावर नगराध्यक्षा र}ा रघुवंशी निर्णय घेऊ शकतात.चारी किंवा उतारचा पर्यायविरचक प्रकल्पाचे मुख्य गेट ते पालिकेला पाणी पुरवठा करणारे पंपींग स्टेशन अर्थात इंटकवेल यात अंतर जास्त आहे. सध्याचा पाणीसाठा हा इंटकवेलपासून लांब अंतरावर आहे. त्यामुळे साठलेले पाणी इंटकवेलर्पयत आणण्यासाठी  धरणात त्या भागात उतार करणे किंवा चारी करून ते पाणी आणणे हा पर्याय आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना नगराध्यक्षांनी दिल्या आहेत.पाणी जपून वापरावेसध्याची पावसाची स्थिती आणि एकुणच पाणीसाठा लक्षात घेता शहरवासीयांनी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. पावसाळ्याचे अवघे दिड महिने शिल्लक आहेत. या दिड महिन्यातील पावसाची स्थिती कशी असते त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. जर अपेक्षीत पाऊस झालाच नाही आणि प्रकल्पातही नव्याने पाणीसाठा झाला नाही तर आणखी पाणी कपातीचे संकट राहणार आहे. ही बाब लक्षात घेता आतापासूनच नागरिकांन पाणी जपून वापरावे अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने पालिकेतर्फे जनजागृती करण्यात येणार आहे.