जिल्हा परिषद रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:25+5:302021-04-06T04:29:25+5:30

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या प्रयोजनासाठी १५ जानेवारी ही तारीख अधिसूचित करण्यात आली असून या तारखेस अस्तित्वात असलेली विधानसभा ...

Draft voter list for Zilla Parishad vacancies published | जिल्हा परिषद रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

जिल्हा परिषद रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या प्रयोजनासाठी १५ जानेवारी ही तारीख अधिसूचित करण्यात आली असून या तारखेस अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादीवर आधारित संबंधित निवडणूक विभाग, निर्वाचक गणात निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर १२ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. प्राप्त हरकती व सूचना लक्षात घेऊन २० एप्रिल रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील रिक्त पदांच्या निवडणुकांकरिता प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच त्यावरून २७ एप्रिल २०२१ रोजी मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी कळविले आहे.

Web Title: Draft voter list for Zilla Parishad vacancies published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.