डी.एल. एड. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:49+5:302021-01-13T05:21:49+5:30
डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेश सन २०२०-२१च्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाइन विशेष फेरीद्वारे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू होत ...

डी.एल. एड. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेश सन २०२०-२१च्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाइन विशेष फेरीद्वारे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू होत आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाइन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या नियमित व एक विशेष फेरी पूर्ण झालेली आहे. तथापि, प्राचार्य अध्यापक विद्यालय व सहयोगी संघटना यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे विशेष फेरी क्रमांक दोन घेण्याबाबत विनंती केलेली आहे. संबंधित जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश होतील. प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी ११ ते १४ जानेवारी राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी डी.एल.एड. विभाग प्रमुख रमेश चौधरी व डायटच्या अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती डायटचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी दिली.