शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

ऑक्सीजन निर्मिती व डायलिसीस युनिटमध्ये जिल्हा झाला स्वयंपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:10 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील रुग्णांना डायलिसीससाठी जिल्हाबाहेर जाण्याची गरज राहणार नाही. जिल्हा रुग्णालयात आता १२ डायलिसीस युनिट ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील रुग्णांना डायलिसीससाठी जिल्हाबाहेर जाण्याची गरज राहणार नाही. जिल्हा रुग्णालयात आता १२ डायलिसीस युनिट कार्यान्वीत झाले आहेत. याशिवाय ऑक्सीजन मध्येही जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे. येथेच ऑक्सीजन निर्मिती केली जात आहे. रुग्ण व नातेवाईकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी जम्बो आरओ प्रकल्प देखील बसविण्यात आला आहे. या सर्व उपक्रमांचा शुभारंभ पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला.  जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील नवे डायलिसीस यंत्र, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प  आणि नेत्ररुग्ण कक्ष व नेत्रशस्त्रक्रियागृहचे  उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपविभागीय अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. या सर्व सुविधांसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या सर्व सुविधा उपयुक्त ठरतील आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना चांगले उपचार मिळतील असा विश्वास यावेळी पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी व्यक्त केला.जिल्हा रुग्णालयात नवे पाच डायलिसीस  यंत्र आणि दोन हजार लिटर क्षमतेचा आर.ओ. प्लॅन्ट बसविण्यात आला असून त्यास ७७.५ लाख रुपये खर्च झाला आहे. डायलिसीस यंत्रामुळे नागरिकांना उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही.कोरोना बाधितांच्या उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनची पूर्तता नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टमधून होणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी एक कोटी १९ लाख रुपये खर्च झाला असून दररोज १२५ जम्बो सिलींडर ऑक्सिजन पुरविण्याची प्रकल्पाची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे कोरोनावरील उपचारासाठी आणि इतरही प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा स्थानिक पातळीवर करणे शक्य होणार आहे.रुग्णालयात २० खाटांचा  नवा नेत्ररुग्ण कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच नेत्रशस्त्रक्रीयागृहदेखील तयार करण्यात आले आहे. त्यासाठी दीड कोटी खर्च करण्यात आला आहे. नेत्र रुग्णांवर आधुनिक उपचार  आणि शस्त्रक्रीया करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.  या सुविधांमुळे सामान्य रुग्णांना त्याचा लाभ होणार असून त्यांचे हजारो रुपयांचा खर्च वाचणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्ट सुरू... जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्वाहनच्या अर्थात लिफ्ट सुविधेचे उद्घाटनही  पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या सुविधेचा चांगला उपयोग होणार आहे. उद्वाहनसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ४८ लक्ष  निधी खर्च करण्यात आला आहे. हे कॅप्सूल प्रकारचे असून सर्व आधुनिक सोईंनीयुक्त आहे.  दीड कोटी रुपये खर्च करून नेत्र कक्ष देखील कार्यान्वीत करण्यात आला आहे. या ठिकाणी २० बेड राहणार आहे. स्वतंत्र नेत्र रुग्णालयात सद्या कोरोना उपचार कक्ष सुरू करण्यात आला आहे. तो कक्ष बंद झाल्यावर हे रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.