शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्याचाही मुहूर्त टळल्याने उपवरांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

नंदुरबार : सुटीचा महिना म्हणून मे महिन्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभांचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा ...

नंदुरबार : सुटीचा महिना म्हणून मे महिन्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभांचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील मे महिना विवाह समारंभांविना गेल्याचे चित्र आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील चुकला आहे. यामुळे मात्र मंगल कार्यालये, लॅान्स, मंडप, बॅण्ड यासह इतर अनेक व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे.

विवाह समारंभांचा महिना म्हणून मे महिन्याकडे पाहिले जाते. दरवर्षी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी राहत असल्यामुळे अनेकांचा कल हा मे महिन्यातच समारंभ आयोजनाकडे असतो. परंतु दोन वर्षांपासून त्यावरही विरजण पडत आहे. यंदा देखील मे महिना विवाह समारंभांविनाच गेला आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील टळला आहे. त्यामुळे सर्वच घटकांवर परिणाम झाला असून, अनेकांनी समारंभ पुढे ढकलण्यातच समाधान मानले आहे.

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

n गेल्या वर्षभरापासून मंगल कार्यालयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. बॅंकांचे हप्ते थकले आहेत. किमान १०० जणांची परवानगी असती तर तेवढ्या लोकांचे पॅकेज घेऊन विवाह समारंभ आयोजित करता येत होते. परंतु केवळ २५ जणांची मर्यादा आहे. अनेक ठिकाणी तर मंगल कार्यालयात समारंभ आयोजित करण्यासह बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

नियमांचा अडसर

लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी शासनाने विविध नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. केवळ २५ जणांच्या उपस्थितीत आयोजन करणे म्हणजे तारेवरची कसरत होते. बॅण्ड नाही, घोडा नाही, हळदी, मेहंदीचे कार्यक्रम नसल्यामुळे अनेक युवक, युवतींनी यंदा विवाहच न करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.