बुडीतात गेलेल्या चार गावातील 12 कुटूंबांचे सुरक्षितस्थळी विस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:19 PM2019-08-30T12:19:01+5:302019-08-30T12:19:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवराची पातळी वाढल्याने अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला होता़ बाधितांची स्थिती दर्शवणारे ...

Displacement of 12 families from four villages in the submerged area | बुडीतात गेलेल्या चार गावातील 12 कुटूंबांचे सुरक्षितस्थळी विस्थापन

बुडीतात गेलेल्या चार गावातील 12 कुटूंबांचे सुरक्षितस्थळी विस्थापन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सरदार सरोवराची पातळी वाढल्याने अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला होता़ बाधितांची स्थिती दर्शवणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होत़े त्याची दखल घेत नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांनी चारही गावांना भेट देत 12 कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलवल़े 
तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या सूचनेनुसार अक्कलकुवा नायब तहसीलदार राजेश अमृतकर, नर्मदा विकास विभागाचे उपअभियंता ए़क़े मालचे, मंडळाधिकारी जी़एम़पाडवी, सिंदुरीचे तलाठी विलास कटारे, मणिबेलीचे तलाठी गजानन पवार यांनी बुधवारी बुडीत झालेल्या बामणी,मणिबेली,चिमलखेडी व इतर गावांना भेट दिली होती़ यादरम्यान बामणी येथील 7 घरे पाण्यात गेल्याचे दिसून आल़े त्यांना तातडीने सुरक्षित शेडमध्ये हलवण्यात आल़े 
बामणी येथील मोश्या टेंब:या  वसावे, काल्या सेसरा वसावे, सेन्या सेसरा वसावे, जान्या सेसरा वसावे, हाराद्या रामजी वसावे, दिवाल्या जुगला वसावे, उदेसिंग वनका वसावे, चिमलखेडी येथील अजरुन पोयरा वसावे, खेत्या फोज्या वसावे, वेच्या टेंब:या वसावे, अमरसिंग काकडय़ा वसावे आणि मणिबेली येथील ओजमा गिमा वसावे यांच्या घरांजवळ सरदार सरोवराचे पाणी आल्याने कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आह़े तलाठी यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन घेत शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आल़े तसेच बाधितांना अडीच क्विंटल गहू आणि तांदूळ यावेळी वितरीत करण्यात आल़े 
नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांनी भेट दिल्यानंतर याठिकाणी बाधितांसाठी इतर सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े विभागाकडून बाधितांसाठी तयार केलेल्या तात्पुरत्या शेडचीही पाहणी करण्यात आली होती़ याठिकाणी दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़
 

Web Title: Displacement of 12 families from four villages in the submerged area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.