शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव स्टेट बॅँकेला समस्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्टेट बँकेमार्फत सुरु केलेल्या धडगाव येथील बॅँक शाखेत केवळ धडगाव तालुक्यातलेच नव्हे तर अक्कलकुवा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्टेट बँकेमार्फत सुरु केलेल्या धडगाव येथील बॅँक शाखेत केवळ धडगाव तालुक्यातलेच नव्हे तर अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश नागरिकही या शाखेचे ग्राहक आहे. शिवाय या बँकेवर धडगाव व मोलगी परिसरातील संपूर्ण शासकीय अर्थव्यवहार व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांचाही भार आहे. परंतु तेथे अपेक्षेनुसार मनुष्यबळ नसल्याने ग्राहक वेठीस धरले जात आहे. ही समस्या बँकेला लागलेले ग्रहणच ठरत आहे.धडगाव - मोलगी परिसराचा व्याप लक्षात घेत स्टेट बँकेमार्फत धडगावसह खंटामोडी व चुलवड येथे शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीयकृत बँक असल्याने परिसरातील नागरिकांनी या बँकांमधून आर्थिक व्यवहार सुरू केला होता. चुलवड या माजी आमदारांच्या गावातील बँक शाखा सिसा, मनवाणी, राडीकलम, कुसुमवेरी, जर्ली, पालखा, बिलबारा, मनखेडी, सुर्यपूर, गौऱ्या, बिजरी, सिरसाणी, कालीबेल, तलाई, नवागाव, चांदसैली, वेलीआंबा, पिपलबारी, पांडामुंड, पाडली, काकरपाटी, असली, रमसुला यासह अन्य गावातील नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी सोयीस्कर ठरत होती. तर खंटामोडीची शाखा कुंडल, वरखेडी, खांडबारा, खडक्या, कात्री, हातधुई, टेंबला, खर्डा, मोख, मोजरा यांच्यासह अक्कलकुवा तालुक्यातील पिंप्रापाणी, भांगरापाणी, उमटी, पिंवटी, जामली, चनवाई, वेरी, कंजाला, डेब्रामाळपासून ते थेट नर्मदा नदी काठापर्यंतच्या नागरिकांसाठी सोटीची होती. परंतु या दोन्ही शाखा काही कारणास्तव बंद पडल्या. तेथील ग्राहक धडगाव शाखेकडे वळविण्यात आल्या. तिन्ही शाखांमधील ग्राहकांमुळे धडगाव स्टेट बँकेची ग्राहक संख्या काही पटींनी वाढली.आधिच या शाखेत शासनाच्या सर्वच विभागांचा अर्थिक व्यवहार, संपूर्ण धडगाव तालुक्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्यांचेही कामकाज याच शाखेत करण्यात येते. एवढा भार असतानाच दोन्ही शाखा वळविण्यात आल्याने धडगाव बँक प्रशासनाची डोकेदुखी वाढली. दोन लाखापेक्षा अधिक खात्यांचा भार असूनही केवळ तीन-चारच अधिकारी नेमण्यात येते. तेथे सेवा बजावणाºया कर्मचाऱ्यांपाठोपाठ खातेदारांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या बॅँक शाखेला समस्यांचे ग्रहण लागल्याचे म्हटले जात आहे. हे ग्रहण सोडविण्यासाठी व ग्राहकांना वेळेवर सेवा देण्यासाठी अपेक्षेनुसार मनुष्यबळ वाढविण्यात यावे, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.धडगावची शाखा सर्वाधिक ग्राहक संख्येच्या पहिल्या दोन शाखांमध्ये स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांच्या तुलनेतच मनुष्यबळही अपेक्षित आहे. परंतु तसे बँक प्रशासनामार्फत करण्यात येत नाही. त्यामुळे मनुष्यबळाच्या बाबतीत ही शाखा शेवटची ठरत आहे. सर्वाधिक ग्राहक अन् सर्वात कमी मनुष्यबळ या विरोधाभासामुळे या बँक शाखेच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. उलट वाढत्या लोकसंख्येमुळे त्यात भर पडत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बँक प्रशासनामार्फत अपेक्षेनुसार सुविधांसाठी मनुष्यबळही उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी होत आहे.पासबुक छपाईसाठीही लागतात लांबवर रांगाअवघ्या सातपुड्यातील एकमेव एटीएम मशिन तेही शाश्वतीरहितकॅश डिपॉझिट मशिन (सीडीएम) सुविधेचा अभावकाम होत नसल्याने बँक ग्राहकांना माराव्या लागतात वारंवार फेºया