शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

गुलीआब्यांतही गावविकास कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सामुहिक वनहक्क प्राप्त झालेल्या 27 गावांमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील गुलीआंबा या गावाचा देखील समावेश आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सामुहिक वनहक्क प्राप्त झालेल्या 27 गावांमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील गुलीआंबा या गावाचा देखील समावेश आहे. तेथील वनहक्क क्षेत्राच्या विकासासाठी पथदर्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून विकास कामांसाठी  सुक्ष्म नियोजन पद्धतीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वनहक्क क्षेत्राच्या संवर्धनासाठी गुलीआंबायेथे वन व्यवस्थापन समिती स्थापना करण्यात आली आहे. लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहभागातून या समित्यांमार्फत  कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. रांजेंद्र भारूड  यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा कॅनव्हर्जन समितीने पुढाकार घेतला असून वन विभागाचे देखील  सहकार्य लाभत आहे. त्यानुसार गुलीआंबा येथे वन समिती व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी सरपंच विजय  पाडवी, अशोक पाडवी,  देविसिंग वळवी, अनिल वसावे, भिका वसावे, बिरम्या वळवी, बाज्या  वळवी आदी  उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी नकाशा तयार करीत त्यातून गावाचा विकास कसा करता येईल याचा आराखडा तयार करीत संभाव्य विकासाचे महत्व पटवून दिले. त्यात सामूहिक वन हक्क हे आदिवासींच्या विकासातील एक नवपर्वणी ठरणार आहे. या नवनिर्मितीतूनच आदिवासी विकासाचा नवा इतिहास  देखील घडणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. 

सामुहिक वनहक्क प्राप्त गुलीआंबा या गावात सरपंच नोमाबाई वसावे, उपसरपंच मैनावती पाडवी, ग्रामसेविका वैशाली गिरासे तर तलाठी म्हणून अनिता वसावे हे गावविकासासाठी कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच वनहक्क क्षेत्रांतर्गत काम राबविण्यात येणार आहे.