शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदनिर्मितीला विभागाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:35 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास यावर्षीपासून प्रारंभ होत असून शासकीय ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास यावर्षीपासून प्रारंभ होत असून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.वैद्यकीय शिक्षण मंत्री  देशमुख म्हणाले की, शंभर विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय  सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मंजुरी दिली आहे. २१ जानेवारी  रोजी नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास परवानगी मिळाली. केंद्राचे ६० टक्के (१९५ कोटी), राज्य शासनाचे ४० टक्के (१३० कोटी) निधी मंजूर झाला आहे. नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग एक ते वर्ग चार संवर्गात पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.आदिवासी विकास मंत्री ॲङ पाडवी  म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ४१.९ एकर जागेत उभारण्यात येणार असून येणाऱ्या काळात महाविद्यालयाच्या कामाबरोबरच रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश ॲड.पाडवी यांनी दिले.