शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

बॅण्ड वादकांनाही परवाणगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बॅण्ड वादकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर बाबींना दिलेल्या सवलतींप्रमाणे बॅण्ड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बॅण्ड वादकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर बाबींना दिलेल्या सवलतींप्रमाणे बॅण्ड वादकांनाही किमान संख्येत सवलत मिळावी व त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुरू करावे अशी मागणी जिल्हा असोसिएशनने केली आहे.नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणीसह वाद्य परवानगीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात स्मरण पत्र देऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटना पुणे संचलित नंदुरबार जिल्हा बँड युनियनचे जिल्हाध्यक्ष सुनिल पवार व पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे सर्वत्र अर्थ व्यवस्था पूर्णपणे बंद पडलेली आहे. यामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. याचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते जुलै महिन्यात लग्नसमारंभासह इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर असल्याने वर्षभराचा हाच महत्त्वाचा हंगाम असतो. या माध्यमातूनच बँड पथकातील कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. या काळात शासनाच्या सूचनेनुसार व्यवसाय बंद पडल्याने बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सद्यपरिस्थितीत बँड कलावंतांना नियमांच्या अधीन राहून १० कलाकारांना वाद्य वाजविण्याची परवानगी मिळावी तसेच शासनातर्फे बँड कलावंतांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यापूर्वी नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे २६ मे रोजी देखील जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर २४ जून रोजी पुन्हा स्मरण पत्र देण्यात आले.या निवेदनावर नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुनिल पवार, जिल्हा उपाध्यक्ष अमित डामरे, तालुकाध्यक्ष प्रमेश वसावे, अजय गावित, निजाम वळवी, किशोर वळवी, रवींद्र गावित तसेच नंदुरबार शहराध्यक्ष सागर सोनवणे या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.ेगेल्या काही वर्षापासून डीजेमुळे बॅण्ड वादकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता त्यात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे किमान वाद्य वाजविणाºयांची अट कायम ठेवत परवाणगी दिली तर व्यवसायाला उभारी येऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.