शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रंग ते शेवाळी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

वाण्याविहीर : बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यानच्या शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरून अंकलेश्वर येथून अवजड ...

वाण्याविहीर : बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यानच्या शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरून अंकलेश्वर येथून अवजड मशिनरी घेऊन येे-जा करणाऱ्या कंटेनर्ससह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. नेत्रंग ते शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गाला तळोद्यापासून बऱ्हाणपूर-अंकलेश्वर आंतरराज्य महामार्ग असल्याने, हा राष्ट्रीय महामार्ग निजामपूर, छडवेल, नंदुरबार, तळोदा, वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, सेलंबा, डेडियापाडा व नेत्रंग असा जातो. तळोदा ते गव्हाली दरम्यान गुजरात राज्यातून मध्यप्रदेशात जाण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय सोयीचा व जवळचा आहे. त्यामुळे दररोज या महामार्गावरून हजारो अवजड वाहनांची ये-जा असते. मात्र, या महामार्गाची रूंदी महाराष्ट्रात फक्त सात मीटर कमी असल्याने व अंकलेश्वर जी. आय. डी. सी.ला ये-जा करणाऱ्या कंटेनरसह अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. सात मीटरचा हा रस्ता रूंदीला कमी पडत असल्याने मोठे गैरसोयीचे व त्रासदायक झाल्याने शेवाळी ते नेत्रंग राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे. या रस्त्याची रूंदी सात मीटरवरून १४ मीटर झाल्यास सोयीचा होऊन रस्त्यावरील अपघाताची संख्याही कमी होणार आहे. त्यामुळे या मार्गाचे तातडीने चौपदरीकरण करण्याची मागणी भाजप अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे.