शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

या शौर्याचे आसमंती दीप उजळू दे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:41 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशसेवेत असणा:या आपल्या जवानांप्रती प्रत्येकाला आदर आणि अभिमान असतो. परंतु सैताणे, ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशसेवेत असणा:या आपल्या जवानांप्रती प्रत्येकाला आदर आणि अभिमान असतो. परंतु सैताणे, ता.नंदुरबार या गावाला आपल्या भुमिपूत्र सैनिकाचा अभिमान काही औरच आहे. 15 ते 20 वर्ष देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावून सेवानिवृत्तीनंतर गावी परतलेल्या जवानाचे स्वागत सैताणे करांनी आपल्याच थाटात केले. भव्य मिरवणूक, सामुहिक सत्कारात बालगोपाळांसह अबालवृद्ध सहभागी झाले. या अनोख्या स्वागताच्या कार्यक्रमाचा अभिमान आणि चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.   पूर्वी सैन्य दलात भरती होणे म्हणजे जसे युद्धात सहभागी होणे असे समजले जात होते. घरची मंडळी सहसा राजी होत नव्हती. परंतु सध्याची तरुणाई सैन्यदलात भरतीसाठी मोठय़ा प्रमाणावर उत्सूक आहे. नंदुरबार तालुक्याचा विचार करता आसाणे आणि सैताणे या गावातील अनेक तरुण मोठय़ा संख्येने सैन्यदलात सेवेत आहेत. त्याचा अभिमान या दोन्ही गावांना आहे. या दोन्ही गावातील सैनिक सेवानिवृत्त होऊन गावी परतल्यावर त्यांचा भव्यदिव्य सत्कार आणि स्वागत करण्याची परंपरा आता या दोन्ही गावांनी सुरू केली आहे. सैताणे येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या सैनिकाचा स्वागताचा भव्यदिव्य कार्यक्रम आणि मिरवूणक प्रत्येक सैनिकाचा आणि देशप्रेमी नागरिकाचा ऊर भरून येईल अशीच होती.गावातील सुपूत्र रावसाहेब जगन्नाथ पाटील हे नुकतेच आर्मि एअर डिफेन्समधून सेवानिवृत्त झाले. त्यांची जास्तीत जास्त सेवा ही जम्मू-कश्मिरमध्येच झाली. त्यामुळे कायम सतत एकीकडे शत्रू आणि दुसरीकडे आतंकवादी या दोन्ही आघाडींवर त्यांना लढावे लागत होते. परिणामी त्यांच्यासह पंचक्रोशीतील सैन्यदलात असणा:या जवानांविषयी नेहमीच चिंता वाटत होती. आता रावसाहेब सेवानिवृत्त होऊन गावी परतले. ते परतणार असल्याची माहिती मिळताच गावातील तरुण मंडळींनी एकत्र येत आपल्या भुमिपूत्राचा सन्मान त्याच अभिमानाने आणि देशप्रमाणे करायचे ठरविले. पाटील हे थेट जम्मूहून गावी आल्यावर गावाच्या वेशीवरच त्यांचे भव्य स्वागत झाले. डीजे, बॅण्डच्या निनादात आणि देशप्रेमाच्या घोषणांनी आसमंत दुमदूमन गेला. निघालेली मिरवणूक प्रत्येकाच्या हृद्याचा ठाव घेणारी आणि देशसेवेविषयी ऊर भरून निघणारी ठरली. सामुहिक सत्कार आणि त्यातून झालेले मनोगतं प्रत्येकाच्या  मनात आणि हृद्यात देशाविषयी किती अभिमान भरला आहे हे दर्शविणारी होती. एका अनोख्या उपक्रमाचे साक्षीदार ठरल्याचा अभिमान गावक:यांना आहे. 

अनोखी मिरवणूक..जवान रावसाहेब पाटील, त्यांची प}ी, आई-वडिल यांना एका सजविलेल्या  उघडय़ा जीपमध्ये बसविण्यात आले. गावाच्या वेशीपासून त्यांची डिजे आणि बॅण्डच्या तालावर मिरवणूक निघाली. गावातील मुख्य भागातून मिरवणूक    विठ्ठल मंदीर चौकात आली. तेथे संपुर्ण गावाने जवान पाटील यांचा सन्मान      केला. पाटील यांनीही आपले अनुभव  कथन करून यातून तरुणांना चांगली   प्रेरणा मिळावी आणि प्रत्येक सैनिकाचा असा सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

प्रत्येक भूमिपूत्राचाकरणार सन्मान.. सेवानिवृत्तीनंतर गावी परतणा:या प्रत्येक भुमिपूत्र सैनिकाचा असेच आणि यापेक्षा अधीक जोमाने स्वागत करण्याचा निर्धार सैताणे करांनी केला आहे. यामुळे तरुणांमध्ये सैन्यदलाप्रती आकर्षण आणि कर्तव्यभावना जागृत होऊन जास्तीत जास्त तरुणांनी देशसेवा करावी हा उद्देश असल्याचे  सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.डी.जी.पाटील यांनी सांगितले. सैताणे गाव नेहमीच विविध उपक्रमात आघाडीवर असते. प्रत्येक ग्रामस्थाला गावाचा अभिमान आहे. या गावाने आता देशसेवा, प्रशासकीय, पोलीस, शिक्षण आणि इतर सेवेत असणा:यांना अशाच पद्धतीने गौरविण्याचे ठरविले आहे. इतरांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे माजी सरपंच बापू पाटील यांनी सांगितले.