शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावद, सुलतानपूर भागात केळीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने रविवारी थैमान घातले होते. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील म्हसावद ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने रविवारी थैमान घातले होते. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील म्हसावद व सुलतानपूर या दोन गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, बुधवारी आमदार राजेश पाडवी यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.तालुक्यातील राणीपूर, म्हसावद, सुलतानपूर या भागात सोसाट्याच्या वादळी वाºयासह मुसळधार पाऊस कोसळला. या अवकाळी कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील सुलवाडे येथील संजय विक्रम पाटील व म्हसावद येथील छोटू पाटील या शेतकऱ्यांच्या केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. मंगळवारी हे शेतकरी अवकाळी पाऊस झाल्यानंतर आपापल्या शेतात पाहणीसाठी गेले असताना तेथे त्यांना वादळी पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आढळून आल्या. यामुळे व्यथित होऊन त्यांनी या घटनेची माहिती आमदार राजेश पाडवी यांच्यासह तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांना दिली.शेतकºयांनी माहिती दिल्यानंतर बुधवारी आमदार पाडवी यांनी नुकसानग्रस्त गावात जाऊन शेतकºयांच्या भेटी घेऊन त्यांचे सांत्वन करीत नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. त्यांनी याबाबत प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे यांना परिस्थितीची माहिती देत म्हसावद व सुलतानपूर या दोन्ही गावांमध्ये नुकसान झालेल्या शेतकºयांचे तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्याचप्रमाणे या दोन्ही गावांव्यतिरिक्त तालुक्याच्या इतर भागात रविवारी कोसळलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची ही माहिती जाणून घेत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी आमदार पाडवी यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे, वीरसिंग पाडवी, छोटू पाटील, संजय पाटील, विठ्ठलराव बागले, प्रवीण वळवी, हितेश मेढेकर उपस्थित होते.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांचे पंचनामे कृषी विभागामार्फत केले जाती. ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला आहे अशांचा अहवाल विमा कंपनीला पाठविला जाईल. त्याचप्रमाणे ज्या शेतकºयांचा पीकविमा नसेल अशांचा अहवाल नुकसान भरपाई करीता राज्य शासनाला सादर केला जाईल.-किशोर हाडपे, तालुका कृषी अधिकारी, शहादा