शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

भांडी व दागिन्यांची मोड करून रोजचा व दवाखान्याचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

त्यातच लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व रोजगार-धंदे ठप्प झाले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे हातावर पोट असणाऱ्या श्रमिक, ...

त्यातच लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व रोजगार-धंदे ठप्प झाले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे हातावर पोट असणाऱ्या श्रमिक, कष्टकरी व सोबतच व्यावसायिकांवर आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने संकट ओढवले आहे. अशात अनेक कुटुंबांतील सदस्य व नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकीकडे रोजगार-धंदे बंद तर दुसरीकडे दैनंदिन चरितार्थ चालविण्यासाठीचा खर्च व दवाखान्याचा खर्च असे दुहेरी-तिहेरी संकट अनेक सर्वसामान्य कुटुंबांपुढे निर्माण झाले आहे.

अशा आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजच्या खर्चातून बचत करून बनविलेले दागिने व तांब्या-पितळीची भांडी अनेक जण सोनार व कासाराकडे विक्री व मोड करत असल्याचे दिसून येत आहे.

चार दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊननंतर सोमवार आठवड्याचा पहिल्याच दिवशी सोनारांच्या व भांड्यांच्या दुकानात सोने, चांदी व तांब्या-पितळेची भांडी विक्री व मोड करण्यासाठी आलेल्या महिलांची गर्दी दिसून आली. एका सराफा व्यावसायिकांच्या दुकानात महिलांची गर्दी पाहून थेट स्वतः तहसीलदार कारवाईसाठी दुकानात गेले. 'कोरोना व लॉकडाऊनमुळे आमचा रोजगार-धंदा हिरावला गेला आहे. आमचे अनेक नातेवाईक दवाखान्यात ॲडमिट आहेत. त्यांच्या उपचारासाठी आम्हाला पैशांची गरज असून सोने-चांदी मोड करण्याशिवाय सद्यस्थितीत आमच्याकडे पर्याय नाही. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आम्ही बाजारात आलो आहेत. आम्हाला आमचे दागिने विक्री करू द्या, नाही तर दुसरा पर्याय तुम्हीच सांगा, अशी विनंती दुकानात सोने-चांदी मोड करण्यासाठी आलेल्या महिला आदिवासी बोलीभाषेत तहसिीलदाराकडे करत होत्या. यावेळी बराच वेळ त्या महिला व तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली कारवाईसाठी आलेल्या महिला यांच्यात जोरदार चर्चा झाली. शेवटी सराफा व्यावसायिकाला पाचशे रुपयांचा दंड आकारणी करून या ठिकाणी सुरू असणाऱ्या वादावर पडदा टाकण्यात आला.

सराफा व्यावसायिकांचे प्रशासनाला निवेदन

सराफा व्यवसायिकांकडून लोकांच्या विनंतीमुळे दुकाने सुरू करावी लागत असून प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याने सराफा असोसिएशनकडून यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन त्यांचे गाऱ्हाणे मांडण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांना दवाखान्यात दाखल होण्यासाठी पैसे रुपयांची नितांत आवश्यकता असते व आपला जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्याने बँकिंग व्यवहार करणे शक्य नाही. त्यामुळे सोने, चांदीचे दागिने गोरगरीब जनता मोड करण्यासाठी, विक्री करण्यासाठी येतात. मात्र सोने-चांदीची दुकाने बंद असल्याने त्यांना वणवण करावी लागते. कारण सध्याची परिस्थिती भयंकर खराब असल्याने ग्राहक अक्षरशः भांडणावर उतरतात. तरी आम्ही सराफ व्यावसायिक लाॅकडाऊनचे आदेशाचे स्वागत करत आहोत. कारण परिस्थिती ही सर्वांना माहित आहे. परंतु अशा परिस्थितीत ग्राहक व दुकानदाराचे संबंध पिढ्यानपिढ्याचे असल्या कारणाने त्यांच्या दुःखात त्याने दागिने मोडून पैसे देणे हे माणुसकीचे नाते सांभाळत अशा परिस्थितीत ही मानवीय सेवा आहे. तरी कृपया या सर्व बाबींचा विचार करून आम्हाला योग्यच ते सहकार्य व्हावे, असे निवेदन तळोदा सराफ व्यावसायिक संघटना यांच्या वतीने तळोदा तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले.

सोनारांकडे अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असतात. अशा संकटाच्या काळात त्यांना मदत करणे हे आमचेदेखील आम्ही कर्तव्य समजतो. काही व्यक्ती खूपच पैशांची गरज असल्याने नाईलाजाने ते दागिने विक्री करत असतात. याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन ग्राहकांना व सराफा व्यावसायिकांना दिलासा द्यावा..

आनंद सोनार, उपाध्यक्ष

तळोदा सोनार असोसिएशन