शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

दागिने विक्री व मोड करण्यासाठी सोनारांकडे गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

कोठार : कोविड परिस्थितीमुळे हातावर पोट असणाऱ्यांना पोट भरणासाठी पैशांची चणचण भासत असल्याने सोने-चांदीचे दागिने मोड करण्यासाठी सराफा ...

कोठार : कोविड परिस्थितीमुळे हातावर पोट असणाऱ्यांना पोट भरणासाठी पैशांची चणचण भासत असल्याने सोने-चांदीचे दागिने मोड करण्यासाठी सराफा व्यवसायाकडे येतात. मात्र, दुकाने बंद असल्याने त्यांना अडचणीच्या सामना करावा लागत आहे. सराफ व्यावसायिकांना लाॅकडाऊनमधून काहीअंशी सूट मिळावी अशी मागणी सराफ व्यावसायिक संघटनेने केेली आहे. या मागणीचे निवेदन, तहसीलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले. निवेदनात, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे व आपल्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांना दवाखान्यात दाखल होण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता असते व आपला जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्याने बँकिंग व्यवहार करणे शक्य नाही. त्यामुळे सोने, चांदीचे दागिने गोरगरीब जनता मोड करण्यासाठी, विक्री करण्यासाठी येतात. मात्र, सोने-चांदीचे दुकाने बंद असल्याने त्यांना वणवण भटकावे लागते. कारण सद्य:परिस्थिती भयंकर खराब असल्याने ग्राहक अक्षरशः भांडणावर उतरतात. तरी आम्ही सराफ व्यावसायिक लाॅकडाऊनचे आदेशाच्या स्वागत करीत आहोत. कारण परिस्थिती ही सर्वांना माहीत आहे; परंतु अशा परिस्थितीत ग्राहक व दुकानदाराचे संबंध पिढ्यान्‌पिढ्याचे असल्या कारणाने त्यांच्या दुःखात त्याने दागिने मोडून पैसे देणे हे माणुसकीचे नाते सांभाळत अशा परिस्थितीत ही मानवीय सेवा आहे, हे नाकारू शकत नाही. तळोदा शहर १०० टक्के लाॅकडाऊन झाले पाहिजे. कारण गावात येणाऱ्या ग्राहकांना अर्धे गाव सुरू, अर्धे गाव बंद असल्याने संभ्रम निर्माण होतो. सर्व बाबींचा विचार करून योग्य ते सहकार्य व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.