शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा शहरातील गर्दी ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

अक्कलकुवा : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सातत्याने होणारी गर्दी संसर्गासाठी ...

अक्कलकुवा : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सातत्याने होणारी गर्दी संसर्गासाठी कारणीभूत ठरत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. अक्कलकुवा शहरामध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असताना शहरात गर्दी होणाऱ्या ठिकाणी योग्य ते नियोजन स्थानिक प्रशासनाने करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. परंतु, असे असतानाही येथील मुख्य बाजारपेठेत दररोज तोबा गर्दी होत असल्याचे भयावह चित्र दिसत आहे. शहरातील सर्व ठिकाणी भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तसेच गुरुवार ते रविवार कडक निर्बंध उठल्यानंतर सोमवार, मंगळवार यादिवशी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होते. दररोज होणारी ही गर्दी टाळण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागाच्या परिसरामध्ये भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्याची अत्यंत गरज असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे रुग्ण अत्यल्प असताना याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्रपणे रिकाम्या मैदानांवर सामाजिक अंतर ठेवून भाजीपाल्याची दुकाने थाटण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण दररोज आढळत असतानाही भाजीपाला बाजारात दररोज होणारी गर्दी टाळण्यासाठी याकडे प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील भाजीपाला बाजार वेगवेगळ्या प्रभागांमध्ये थाटण्यासाठी तालुका प्रशासनाला त्वरित आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शहरांमधील मुख्य भाजीपाला बाजारात दररोज भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग ग्राहकांमध्ये दिसून येत नसल्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्यास ही गर्दीदेखील कारणीभूत ठरू शकते, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, तरी तातडीने याबाबत प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.