प्रहारतर्फे मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:58 IST2019-11-19T11:57:39+5:302019-11-19T11:58:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतक:यांवर अस्मानी-सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला ...

प्रहारतर्फे मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतक:यांवर अस्मानी-सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला आहे. पंचनाम्यांचे सोपस्कारही पुर्ण करण्यात आले. भरपाई वेळेवर मिळाली तर शेतक:यास रब्बी हंगामाच्या भांडवलासाठी कामात येईल. त्यामुळे सरकसकट 25 हजाराची भरपाईची रक्कम त्वरित द्यावी. या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक शेतक:यांनी एकत्र येत प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी माहिती देतांना जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी सांगितले, जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळात होळपळत आहे. दुष्काळाच्या झळा सोसणा:या शेतक:यांवर यंदा वरूण राजाने मेहर केली. चांगला पाऊस झाला मात्र तो पाऊस हातातोंडातील घास घेऊन जाईल, असे वाटले नव्हते. सर्वत्र शेतकरी समाधानी असतांना पावसाने मात्र कहरच केला. एवढा बरसला की, सर्वत्र जलमय झाले. त्यातून अतिवृष्टीचे संकट उभे राहिले. त्यानंतर काही शेतक:यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतकरी खचला आहे.
अस्मानी-सुलतानी संकटाने बेजार झालेले असतांना शेतक:यांचा कोणीही वाली उरला नाही. राज्यात शासन स्थापनेचे सत्तानाटय़ रंगले आहे. त्यातून राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे शेतक:यांचे नुकसानीचे पंचनमे झाले. त्यांना सरसकट 25 हजारांची भरपाई द्यावी म्हणून गेल्या आठवडय़ात जिल्हाधिका:यांमार्फत निवेदन देण्यात आले होते. भरपाई त्वरित न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र सत्तानाटय़ व राष्ट्रपती राजवट यामुळे शेतक:यांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
खरीप हातातून गेलेल्या शेतक:यांना रब्बीची आस आहे. मात्र त्यासाठी हातात पैसा नाही. म्हणून जर नुकसानभरपाईची रक्कम त्वरित दिली तर रब्बीसाठी ती कामात येईल. त्यासाठी त्वरित भरपाईची रक्कम मागणीचे कळविले असताना, शेतक:यांना अद्याप ती मिळाली नाही. म्हणून प्रहार शेतकरी संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात बारकू शिरोळे , मोहन पाटील, प्रमोद दगडू पाटील, सावळीराम करे, गजानन वसावे, उदयसिंग गिरासे, शशिकांत पाटील, प्रभाकर पाटील, सुदाम वरसाळे, शरद साळवे, ब्रिजलाल धनगर, संजय पाटील, राणूलाल जैन, चपाय राऊत, दिपाल्या वसावे, रामसिग वसावे सहभागी झाले होते.
जिल्ह्यात मनाई आदेश असतांना आंदोलन करू नये अशा सुचना प्रशासनातर्फे आंदोलकांना देण्यात आल्या होत्या. परंतु तरीही संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन देतांना आंदोलकांना पोलिसीन ताब्यात घेतले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. सर्व आंदोलकांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.