पाण्यासाठी शेतक-यांवर दाखल होणार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:57 PM2018-05-22T12:57:18+5:302018-05-22T12:57:18+5:30

पाटबंधारे विभागाचे अजब आदेश : पाणी चोरीच्या तोंडी माहितीवरून काढले पत्र

Criminal cases filed against farmers for water | पाण्यासाठी शेतक-यांवर दाखल होणार गुन्हे

पाण्यासाठी शेतक-यांवर दाखल होणार गुन्हे

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 22 : वावद, ता़ नंदुरबार येथील लघु प्रकल्पातून सिंचनासाठी शेतकरी पाणी चोरी करत असल्याचा आरोप करत लघुपाटबंधारे विभागाने शेतक:यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढले आहेत़ या आदेशांपूर्वी  नंदुरबार उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर याठिकाणी असा कोणताच प्रकार नसल्याचे समोर आल्यानंतर हे आदेश काढण्यात आले आहेत़    
वावद लघुतलावातून पाणी चोरी होत असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी धुळे पाटबंधारे विभागाला अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली होती़ या तोंडी माहितीनंतर धुळे पाटबंधारे विभागाने नंदुरबार येथील अधिका:यांना तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या़ यानुसार सोमवारी सकाळी उपविभागीय अभियंता एम़बी़ पाटील, शाखा अभियंता एऩएस़ पेटकर, आऱबी़ सोनार, योगेश कोळी, कालवा चौकीदार शंकर गवळी यांच्या पथकाने वावद येथे भेट देत पाहणी केली होती़ या वेळी त्यांना याठिकाणाहून पाणी चोरी होत असल्याचा कोणताही प्रकार आढळून आला नसल्याचा अहवाल दुपारी 12 वाजेर्पयत धुळे कार्यालयात पाठवण्यात आला़ यानंतरही  धुळे येथील मुख्य कार्यालयाने सोमवारी दुपारीच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना पत्र देत शेतक:यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत़ या शेतक:यांना गेल्या वर्षी पाणी उपसा करण्याची परवानगी होती़ यंदा मात्र या शेतक:यांनी कोणत्याही प्रकारे पाणी उपसा केला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे असतानाही विभागाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत़ विशेष म्हणजे वावद लघुतलावात केवळ 12 टक्के पाणीसाठा उपलब्ध आह़े पाटबंधारे विभागाने गेल्या रब्बी आणि चालू खरीप हंगामासाठी एकाही शेतक:याला यंदाच्या वर्षात पाणी परवानगी दिलेली नाही़ यापूर्वी परवानगी घेणा:या शेतक:यांनी मोटारी उचलून घेतल्या आहेत़ वावद ता़ नंदुरबार येथील लघुप्रकल्पातून पाणी उपसा करणा:या 10 शेतक:यांनी पाणी उपसा करण्यासाठी केवळ ईलेक्ट्रीक मोटार लावून पाणी उपसा करण्याची परवानगी असताना तलावाच्या जमिनीत 200 फूट खोल कूपनलिका करून त्यातून पाणी उपसा सुरू केल्याचे तसेच शेतक:यांनी 4 किलोमीटर्पयत पाईप लाईन टाकून नगदी पिकांसाठी पाणी चोरी केल्याची तक्रार पाटबंधारे विभागाच्या धुळे कार्यालयात केली होती़ 
4यानुसार धुळे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना पत्र पाठवून पाणी उचलणा:या शेतक:यांवर गुन्हे दाखल करण्याचे सूचित केले आह़े विशेष बाब म्हणजे नंदुरबार कार्यालयाचे उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता यांनी पडताळणी करून अहवाल पोहोचवण्यापूर्वीच कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिका:यांना हे पत्र दिले आह़े 
 

Web Title: Criminal cases filed against farmers for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.