शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बांधकाम अभियंता व ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खाजगी ठेकेदाराकडून आठ लाखाचे बील काढण्यासाठी २४ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शहादा पंचायत समितीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खाजगी ठेकेदाराकडून आठ लाखाचे बील काढण्यासाठी २४ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शहादा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता व टेंभली, ता.शहादाचे ग्रामसेवक यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात देखील पंचायत समितीचे बांधकाम अभियंता लाचप्रकरणी जाळ्यात अडकले होते.राजेश लक्ष्मण पाटील, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती, शहादा व प्रविणसिंह कोमलसिंह गिरासे, ग्रामसेवक, गृप ग्रामपंचायत टेंभली, ता.शहादा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खाजगी ठेकेदार यांनी २०१८-१९ या कालावधीत टेंभली ग्रुप ग्रामपंचायतंतर्गत होळ गुजरी ग्रामपंचायतीचा वस्ती रस्ता काँक्रीटीकरणाचे काम जनसुविधा २५२५ योजनेअंतर्गत करण्यात आले. त्याची निविदा नऊ लाख ९९ हजार रुपये इतकी होती.नोंदणीकृत एजन्सीने हे काम घेऊन सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून तक्रारदार यांना दिले होते व तसा करारनामा करण्यात आला होता. ते काम डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण झाल्याने टेंभली ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेने आठ लाख पाच हजार २०० रुपये रक्कमेचा चेक मार्च महिन्यात वर्ग केला. परंतु रक्कम न मिळाल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी ठेकेदार राजेश पाटील व ग्रामसेवक प्रविणसिंह गिरासे यांना विचारले असता राजेश पाटील यांनी ठकेदाराकडे २४ हजार रुपये लाचेची मागणी केली.ग्रामसेवक यांनी त्यास प्रोत्साहन दिले. ८ आॅगस्ट रोजी हा प्रकार पंचायत समितीत घडला. तक्रारदार आणि पंचासमक्ष प्रकार घडल्याने १० आॅगस्ट रोजी याबाबत फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अभियंता राजेश पाटील व ग्रामसेवक प्रविणसिंह गिरासे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शिरिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक जयलपाल अहिरराव, हवालदार उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, पोलीस नाईक दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली यांनी ही कारवाई केली.दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत तीन महिन्यात तीन अभियंते लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.