महात्मा फुले युवा मंचतर्फे वृक्षारोपणासाठी रोपांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:54+5:302021-01-13T05:21:54+5:30

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करून ती वाढविणे गरजेचे आहे. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. ईश्वर माळी यांनी महात्मा ...

Creation of saplings for tree planting by Mahatma Phule Youth Forum | महात्मा फुले युवा मंचतर्फे वृक्षारोपणासाठी रोपांची निर्मिती

महात्मा फुले युवा मंचतर्फे वृक्षारोपणासाठी रोपांची निर्मिती

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करून ती वाढविणे गरजेचे आहे. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. ईश्वर माळी यांनी महात्मा जोतिबा युवा मंच ऑल इंडिया या संघटनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत जयनगरसह परिसरातील गावांमध्ये व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्षलागवड केली आहे. मंचतर्फे यंदा ११ हजार रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांनी स्वतःच्या शेतात जागा तयार करून पिशवीमध्ये बियाणे लागवडीची सुरुवात केली आहे. तयार झालेली रोपे जयनगर परिसरातील गावांमधील जिल्हा परिषद शाळा, मंदिर परिसर, ग्रामपंचायत परिसर, अमरधाम तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा लावली जाणार आहे. यामध्ये दर्जेदार व पर्यावरण पोषक कडुनिंब, चिंच, जांभूळ, बोर, आवळा, सीताफळ, चिकू, सिसम आदी रोपांचा समावेश आहे.

Web Title: Creation of saplings for tree planting by Mahatma Phule Youth Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.