शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील काठी गावात कोरोना लसीकरण महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

जिल्हा परिषद सदस्य सी.के. पाडवी यांच्यासह युनिसेफ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून प्रशासनाच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले. नागरिकांना ...

जिल्हा परिषद सदस्य सी.के. पाडवी यांच्यासह युनिसेफ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून प्रशासनाच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले. नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप उभारण्यात आला. नोंदणी करताना मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर मात करीत शिक्षक आणि आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांनी मंडपापासून दीड किलोमीटर दूर नेटवर्क असलेल्या जागी टेबल मांडून नागरिकांची नोंदणी केली. मंडपाच्या जागी आधारकार्ड तपासणी, नोंदणी तपासणी आणि माहिती देण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी परिसराच्या गावातील काही प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील याचठिकाणी लस घेतली. नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लसीकरणाच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला. शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना लसीकरणाचे महत्व आणि कोरोना विषयक मार्गदर्शक सूचना समजावून सांगत होते.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सी.के. पाडवी म्हणाले की, सर्वांना देण्यात येणारी लस एकसारखी आहे. बाहेरील जिल्ह्यात किंवा राज्यात रोजगारासाठी जाताना लसीकरण महत्वाचे ठरणार आहे. आपण स्वत: रांगेत उभे राहून इतर नागरिकांनी लस घेतल्यावर तीच लस घेतली आहे. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असल्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे सांगितले.

यावेळी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील मालखेडे, युनिसेफ तालुका समन्वयक जितेंद्र वळवी, मोलगीचे पोलीस निरीक्षक धनराज निळे, उपअभियंता भरत पटले, सरपंच स्नेहा पाडवी, ग्रामसेवक नरोत्तम बिऱ्हाडे, डॉ.कुलदीप ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य मिराबाई वळवी, सागर पाडवी आदी उपस्थित होते. लसीकरण शिबीर आयोजनासाठी आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, युनिसेफ प्रतिनिधी, ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले. उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना धन्यवाद दिले असून शिबिर यशस्वी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शिबिराचे यशस्वी नियोजन

आरोग्य विभाग, युनिसेफ कर्मचारी, ग्रामपंचायत, आशा वर्कर यांची बैठक घेण्यात आली.

ग्रामस्थ, प्रतिष्ठित व्यक्ती यांची बैठक घेण्यात येऊन लसीकरणाची माहिती देण्यात आली.

गावात ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्रातर्फे वाहनांमार्फत कोविड-१९ बद्दल जनजागृती करण्यात आली.

युनिसेफ कर्मचारी यांनी गावात घरो घरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवून दिले. आणि अफवांबाबत माहिती देऊन गैरसमज दूर करण्यात आला.

युनिसेफ कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य यांच्याद्वारे लसीकरणासाठी यादी तयार करण्यात आली.

महिला बचत गटाची बैठक घेण्यात आली. ऑनलाईन नोंदणीसाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी नेट सुविधा होती त्याठिकाणी शिक्षक आणि आरोग्य सेवक एकूण आठ लोकांची टीम तयार करण्यात आली.

कॅम्पमध्ये येणाऱ्या लोकांसाठी ग्रामपंचायत तर्फे जेवणाची व्यवस्था आणि लसीकरण झाल्यानंतर चहा बिस्कीट आणि त्याचबरोबर मास्क देण्यात आले.

युनिसेफ कार्यकर्ते रवींद्र वळवी, जयसिंग वसावे, प्रदीप पाडवी यांनी पाड्या-पाड्यात जाऊन समुपदेशन आणि बैठका घेतल्या. आणि लसीकरणाचे महत्व पटवून दिले. लसीकरणाच्या याद्या तयार केल्या.