शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊनच करावे लागते कंट्रोलला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:29 IST

मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कंट्रोलरूम मध्ये दररोज शेकडो कॅाल स्विकारतांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी ...

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कंट्रोलरूम मध्ये दररोज शेकडो कॅाल स्विकारतांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते. कॅाल करणारे काही वेळा खरंच गरजवंत असतात तर काहीजण निव्वळ फेक कॅाल करतात. अशा वेळी संताप येतो, परंतु त्यावर नियंत्रण ठेऊन काम करावे लागत असल्याचा अनुभव पोलीस कंट्रोलरूम मध्ये १०० नंबरचे कॅाल हाताळणारे हवालदार संजय सावळे यांनी सांगितला.सार्वजनिक क्षेत्रात विशेषत: पोलीस दलात काम करतांना अनेक ताणतणाव, प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागत आपले कर्तव्य पार पाडावे लागते. त्यात दररोज अनेकांशी फोनद्वारे संपर्क येणारा विभाग म्हणजे कंट्रोल रूम. या कंट्रोल रूममधील १०० क्रमांकावर दररोज अनेकांचे फोन येतात. कधी कुणा गरजवंताला मदत लागते, कुठे आग लागलेेली असते, कुठेे अपघात झालेला असतो तर कुठे चोरी असे विविध प्रकारचे फोन आल्यावर त्यांच्याकडून सर्व माहिती शांततेने ऐकुण घ्यावी लागते. ज्यांनी फोन केला ते कुठे आहेत, त्यांना कशा प्रकारची मदत हवी आहे. नेमके त्यांचे लोकशेन कुठे आहे. त्यांच्या जवळचे पोलीस ठाणे, दूरक्षेत्र पोलीस ठाणे कोणते आहे याची पडताळणी करून संबधीतांना लागलीच मदत मिळूवन देण्यासाठी तत्परता दाखवावी लागते. लागलीच दखल घेतली गेल्याने अनेकांचे जीव वाचले, अनेकांना वेळेवर मदत मिळाल्याचे संजय सावळे यांनी सांगितले. कंट्रोल रुममधील सर्वच कर्मचारी हे संवेदनशील असतात.

फेक कॅालची समस्या वाढली सद्या कंट्रोल रूममध्ये अर्थात १०० क्रमांकावर फेक कॅालचे प्रमाण वाढले आहे. कुणीही कुणाचा काटा काढणे, मजाक करणे यासाठी खोटी माहिती देतात. यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो, शिवाय गरजवंताला मदत करण्यास विलंब होतो. अशा वेळी आलेला राग गिळावा लागतो. 

 कंट्रोल रूमकडे महिला, मुलींकडून करण्यात येणार कॅाल देखील वाढले आहेत. कुणी त्रास देत असेल, घरगुती भांडण असेल, सार्वजनिक ठिकाणी त्रासाचा प्रकार असेल तर महिला आता धिटपणे कॅाल करतात. अशा कॅालची लागलीच दखल घेऊन संबधीतांना सुचना दिली जाते. दररोज दैनंदिन काम करतांना येथील कर्मचारी यांना कान व डोळे नेहमीच सतर्क ठेवावे लागतात.

कंट्रोल रूमला दररोज म्हणजे २४ तासात साधारणत: ८० ते १०० कॅाल येतात. सर्वच कॅाल हे विविध विषयांचे असतात. सर्वाधिक मदतीचे तर काही कॅाल हे माहिती देणारे असतात. शासनाची ही सुविधा चांगली असून त्याचा योग्य वापर करावा अशी अपेक्षा कंट्रोलचे पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर व कर्मचारी संजय सावळे यांनी सांगितले.