शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बांधकाम पाटील तर कृषी रघुवंशीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:51 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या विषय समितींचे वाटप आणि त्यातील सदस्यांची निवड समन्वयाने करण्यात आली. यासाठी सोमवार, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या विषय समितींचे वाटप आणि त्यातील सदस्यांची निवड समन्वयाने करण्यात आली. यासाठी सोमवार, १७ रोजी झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा सिमा वळवी होत्या. दरम्यान, लक्ष लागून असलेली बांधकाम व अर्थ समिती अखेर अभिजीत पाटील यांच्याकडे गेली.महिनाभरापूर्वी अर्थात १७ जानेवारी रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करण्यात आली होती. त्यानंतर विषय समिती सभापतींची निवड झाली. त्यात समाजकल्याण समिती रतन खत्र्या पाडवी यांच्याकडे तर महिला व बालकल्याण समितीवर निर्मला सिताराम राऊत यांची निवड झाली होती. अभिजीत पाटील व जयश्री पाटील यांच्यासह उपाध्यक्ष राम रघुवंशी यांना समिती वाटप करण्याचे बाकी होते. या तिघांना विषय समिती वाटप आणि विषय समितींवर सदस्यांच्या निवडीसाठी सोमवारी दुपारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्षा सिमा वळवी होत्या.उपाध्यक्ष राम चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन आणि दुग्ध समिती देण्यात आली आहे. अभिजीत मोतिलाल पाटील यांच्याकडे अर्थ व बांधकाम समिती देण्यात आली तर जयश्री दिपक पाटील यांच्याकडे आरोग्य, शिक्षण व क्रिडा समिती देण्यात आली आहे.यानंतर विविध समितींवर सदस्यांची देखील निवड करण्यात आली.जलव्यवस्थापन समितीजलव्यवस्थापन समितीच्या पदसिद्ध सभापती या अध्यक्षा असून उपाध्यक्षांसह चारही सभापती व अजित नाईक, सुहास नाईक, सुरेश गावीत, विजया गावीत, वृंदाबाई गावीत व शकुंतला शिंत्रे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.स्थायी समितीस्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती या अध्यक्षा असून उपाध्यक्षांसह चारही सभापती आणि मधुकर नाईक, अर्चना गावीत, देवमन पवार, छत्रसिंग पाडवी, हिरा पाडवी, धनराज पाटील, भरत गावीत व विजयसिंग पराडके यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.अर्थ समितीअर्थ समितीत सभापती अभिजीत पाटील यांच्यासह सदस्य म्हणून प्रताप वसावे, राया मावची, छत्रसिंग पाडवी, कपिलदेव चौधरी, राजेश्री गावीत, रुचिका पाटील, पार्वती गावीत व शकुंतला शिंत्रे हे सदस्य म्हणून राहतील.बांधकाम समितीअभिजीत पाटील सभापती तर राया मावची, जितेंद्र पाडवी, संगिता पावरा, रजनी नाईक, भूषण कामे, धरममसिंग वसावे, शोभा पाटील, शंकर पाडवी यांची सदस्य म्हणून निवड झाली.कृषी समितीराम रघुवंशी हे सभापती असून शैलेश वसावे, रुपसिंग तडवी, जान्या पाडवी, कविता पावरा, कुमुदिनी गावीत, संगिता वळवी, सुशिला कोकणी, मंगलाबाई जाधव, गुलाल भिल व हिरा पराडके यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.पशुसंवर्धन समितीसमितीचे सभापती हे राम रघुवंशी तर सदस्य म्हणून सुभाष पटले, प्रकाश कोकणी, प्रकाश गावीत, वंदना पटले, बायजाबाई भिल, मोगरा पवार, सुनिता पवार, गणेश पराडके यांनी निवड झाली.शिक्षण समितीसभापतीपदी जयश्री पाटील असून प्रताप वसावे, प्रकाश कोकणी, सुहास नाईक, शालीनीबाई सनेर, सुनिता पवार, वंदना पटले, मोगरा पवार व गणेश पराडके यांची सदस्य म्हणून निवड झाली.आरोग्य समितीजयश्री गावीत या सभापती तर शैलेश वसावे, सुभाष पटले, जान्या पाडवी, भारती भिल, राजेश्री गावीत, यशवंत ठाकरे, संगिता गावीत व रवींद्र पराडके यांची सदस्यपदी निवड झाली.समाज कल्याण समितीसमाज कल्याण समिती सभापतीपदी रतन पाडवी असून सदस्यपदी निलूबाई पाडवी, रतिलाल कोकणी, गुलाल भिल, संगिता वळवी, बाजू वसावे, अजित नाईक, रुपसिंग तडवी, योगिनी भारती, वृंदाबाई नाईक, शालीनी सनेर व जिजाबाई ठाकरे यांची सदस्यपदी निवड झाली.महिला व बालकल्याणसमिती सभापतीपदी निर्मला राऊत तर सदस्यपदी कविता पावरा, रजनी नाईक, मनिषा वसावे, पार्वती गावीत, जिजाबाई ठाकरे, मंगलाबाई जाधव, सुशिला कोकणी व बाजू वसावे यांची निवड करण्यात आली.जिल्हा परिषदेत प्रतिष्ठेची असलेली बांधकाम व अर्थ समिती कुणाकडे जाते याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. सुरुवातीला राम रघुवंशी यांचे नाव चर्चेत होते. नंतर त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर जयश्री पाटील व अभिजीत पाटील या शहादा तालुक्यातील सभापतींनी या समितीवर दावा सांगण्यास सुरुवात केली. दोघांपैकी कुणाला मिळते याबाबत उत्सूता होती. अखेर काँग्रेसचे अभिजीत पाटील यांनी त्यात बाजी मारली.भिंत पाडल्याची १५ दिवसात चौकशी...उपाध्यक्षांच्या दालनातील भिंत पाडल्याची चौकशी १५ दिवसात पुर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. याबाबत अर्चना गावीत व राजेश्री गावीत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दोषी असल्यास संबधीत अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सीईओ गौडा यांनी उत्तर देत निष्पक्ष चौकशी होणार आहे. जो कुणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर अध्यक्षांच्या परवाणगीने प्रशासकीय कारवाई केली जाईल. त्यासाठी संबधितांना १५ दिवसांचा कालावधी देण्यात आल्याचे गौडा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कार्यकारी अभियंता दिलीप चौधरी यांनी तक्रारकर्त्या अर्चना गावत यांना काय सांगितले होते ते सभागृहात सांगावे अशी मागणी त्यांनी केली, परंतु चौधरी यांनी आपण काहीही सांगितले नसल्याचा पवित्रा यावेळी घेतला.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड आणि विषय समिती सभापती निवडीच्या वेळी राजकारण ढवळून निघाले होते. मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामुळे विषय समिती सदस्यांची निवड करतांना देखील ती परिस्थिती निर्माण होते किंवा कसे याबाबत संदिग्धता होती. ही बाब लक्षात घेता सोमवारी जिल्हा परिषदेने मतदानाचीही तयारी करून ठेवली होती.ऐनवेळी मतदानाची मागणी झाली तर धावपळ व्हायला नको म्हणून तयारी पुर्ण करण्यात आली होती. परंतु गेल्या दोन्ही वेळचे कटू प्रसंग टाळून तिन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकत्र येत सदस्यांची नावे सुचविली आणि त्याप्रमाणे सर्वच विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने देखील सुटकेचा नि:श्वास घेतला.