लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कॅांग्रेसने ऑनलाईन पद्धतीने शेतकरी बचाव रॅलीचे राज्य स्तरावरून आयोजन केले होते. त्यात नंदुरबारातील नेेते व पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. पालकमंत्री के.सी.पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी आज शेतकरी बचाव रॅली चे आयोजन करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने या रॅलीत संपुर्ण जिल्ह्यातून काँग्रेसचे नेते एकत्र जमले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादाच अशा प्रकारे रॅलीद्वारे आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकार बोलते काय आणि करते काय, केंद्र सरकारने आणलेला हा कायदा शेतकरी व कामगारांना खाईत लोटणारा आहे. या कायद्याला आमचा विरोध असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरू असे या वेळी ठरविण्यात आले. नंदुरबार जिल्हातून या रॅलीत आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी सहभागी झाले. यावेळी पंडितराव पवार, देवा चौधरी, इकबाल कुरेशी, ईश्वर चौधरी, रवींद्र कोठारी, देवमन पवार, विक्रम वळवी आदी उपस्थित होते.
कॅांग्रेसची ऑनलाईन शेतकरी बचाव रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:55 IST